इंदौरमधील शंभर कोटीपेक्षा अधिकच्या थकबाकीदार नॅशनल स्टिलचे विज कनेक्शन कापले
इंदौर प्रतिनिधी
29जुलै
मध्यप्रदेशातील पश्चिम भाग विद्युत वितरण कंपनीने थकबाकीची रक्कम वसुली बाबत आता पर्यंतची सर्वांत मोठी कारवाई इंदौरमध्ये केली आहे. येथील नॅशनल स्टिलकडील 103 कोटी रुपयांच्या थकित रक्कमेला वसूल करण्यासाठी कंपनीचे विज कनेक्शन कापले आहे.
मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीच्या इंदौरमधील ग-ामीण भागाचे अधीक्षक यंत्री डी.एन. शर्मानी सांगितले की विज चोरी, अनाधिकृत उपयोग आदीं बाबत नॅशनल स्टिलचे जवळपास सहा वर्षापूर्वी प्रकरण बनले होते. उक्त कंपनीने स्थानिय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आदीकडून दिलासा मिळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला होता.
सर्वोच्च न्यायालयानेही विज वितरण कंपनीच्या बाजूने निर्णय दिला होता. यानंतर नॅशनल स्टिलने 27 जुलैला पुन्हा इंदौर उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. परंतु उच्च न्यायालयाकडूनही नॅशनल स्टिलला कोणताही दिलासा मिळालेला नाही.
सांगण्यात आले की इंदौर-धार रोडवरील नॅशनल स्टिलकडे थकीत रक्कम 103 कोटी रुपये आहे. याला पाहता कंपनी आणि कॉलोनीचे कनेक्शन 33 केव्ही गि-डमधून कापले गेले. विज वितरण कंपनीने पहिल्यांदाच 100 कोटी रुपयापेक्षा अधिकची थकित रक्कम वसूल करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई केली आहे. याच बरोबर नॅशनल स्टिलच्या बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया शाखातील खात्यांनाही गोठवले आहे.