हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत

शिमला प्रतिनिधी

28 जुलै

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकार्‍यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुदेश कुमार मोख्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिति जिल्ह्यात ढगफुटीमुळं अचानक आलेल्या पुरामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. त्यासोबतच चंबा जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची सूचना मिळत आहे.

त्यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री जवळपास आठ वाजता लाहौलमधून उदयपूरमध्ये ढगफुटी झाली. मजुरांचे दोन तंबू आणि एक जेसीबी मशीन पाण्यात वाहून गेली. मुळच्या जम्मू-काश्मीर येथील रहिवाशी असणआर्‍या 19 वर्षीय श्रमिक मोहम्मद अल्ताफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य पोलीस आणि भारत तिबेटीयन सीमा पोलिस दलांच्या वतीनं बेपत्ता लोकांना शोधण्याचं काम सुरु आहे. परंतु, पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत. मंगळवारी शोधकार्य पाण्याच्या प्रवाहामुळं थांबवण्यात आलं. बुधवारी मात्र शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहौल-स्पितीच्या विविध भागांत अनेक ठिकाणी भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळं अनेक रस्ते, महामार्ग बंद आहे. जवळपास 60 वाहनं पुरात अडकली आहे.

यादरम्यान, हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अधिकार्‍यांनी सांगितलं की, यापूर्वी मंगळवारी मुसळधार पावसामुळं भागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं लाहौल-स्पितीच्या दारचा गावांतून अनेक जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं. दारचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्यामुळे नदीच्या किनार्‍यावरील तीन दुकानांचही नुकसान झालं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!