राईस मिलमध्ये लिपीक ते कर्नाटकचे चार वेळा मुख्यमंत्री.. सायकलवरून भाजपचा प्रचार केलेल्या येदियुरप्पांचा राजकीय प्रवास

कर्नाटक

26 जुलै

26 जुलै 2021 रोजी कर्नाटकच्या राजकारणाने पुन्हा एकदा कुस बदलली. मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्काना पूर्णविराम देत आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला. 78 वर्षीय या लिंगायत नेत्याला निरोप देण्याआधी 15 मे 2018 ते 19 मे 2018 दरम्यान कर्नाटकात जे काही घडले ते जाणून घ्यावे लागेल.

15 मे 2018 रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. कोणत्याही राजकीय पक्षास पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. भारतीय जनता पक्ष 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग-ेसला 78 तर जनता दल (सेक्युलर) पक्षाला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून 17 मे 2018 रोजी बुकानाकेरे सिद्दलिंगप्पा येदियुरप्पा म्हणजे बी. एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

स्पष्ट बहुमत नसल्याकारणाने दोनच दिवसात म्हणजे 19 मे रोजी ’येदि’ यांनी विधानसभेत एक भावनिक भाषण करून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग-ेसच्या समर्थनावर एच. डी. कुमारस्वामी यांनी सरकार स्थापन केले होते. मात्र एक वर्षानंतर 2019 मध्ये काँग-ेसचे 14 आणि जेडी (एस)च्या तीन आमदारांनी बंडखोरी केली अन् कुमारस्वामींचे सरकार कोसळले. त्यावेळी अशी चर्चा सुरू होती, की येदियुरप्पा यांच्या नेतृत्वातच भाजपने ऑॅपरेशन लोटस राबवले व पुन्हा सत्ता हस्तगत केली.

येदियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्याने डिसेंबर महिन्यात पोटनिवडणुका झाल्या व भाजपने 12 जागांवर विजय मिळवून विधानसभेतील बहुमत पक्के केले. कर्नाटक विधानसभेत्या एकूण जागा 224 आहेत व बहुमतासाठी 113 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात येदियुरप्पा ’बीएसवाय’ आणि ’येदि’या नावांनी प्रसिद्ध आहेत. ’बीएसवाय’ अशी वेळी मुख्यमंत्री बनले जेव्हा त्यांच्या वयाच्या नेत्यांना पक्षाच्या सल्लागार समितीमध्ये पाठवले जात होते.

येदियुरप्पा यांना हायकमांडने 2018 मध्ये सीएम का बनवले ?

कर्नाटकच्या राजकारणात येदियुरप्पा यांचे मोठे वजन आहे. येदियुरप्पा यांनी 2008 मध्ये एकट्याच्या बळावर भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवले होते. 2019 मध्ये 78 वर्षीय येदियुरप्पा यांना पर्याय ठरणार नेता भाजपकडे नव्हता. ऑॅपरेशन लोटस यशस्वी करून येदियुरप्पा यांनी आपली ताकद दाखवून दिली होती.

लिंगायत मुख्यमंत्री हटवणे भाजपसाठी कठीण –

येदियुरप्पा लिंगायत समाजाचे नेतृत्व करतात. राज्य सर्वाधिक 17 टक्के लोकसंख्या या समाजाची आहे. आतार्यंत आठ मुख्यमंत्री या समाजाने दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात 120 120 विधानसभा मतदारसंघात या समाजाचा दबदबा आहे. लिंगायत समाज बीजेपी व येदियुरप्पा यांचा समर्थक आहे.

जेव्हा येदि यांना हटवण्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी लिंगायत समाजाच्या लिंगेश्वर मंदिराचे मठाधीश शरनबासवलिंगा यांनी म्हटले की, निवडणुका कशा जिंकल्या जातात हे दिल्लीच्या लोकांना माहीत नाही. राज्यात येदियुरप्पा यांनी भाजपचे सरकार बनवले आहे. त्यामुळे त्यांना हटवणे भाजपला नुकसानकारण ठरू शकते. बीजेपीने ’बीएसवाई’ विना 2013 मध्ये विधानसभा निवडणुका लढल्या होत्या. त्यावेळी भाजप आमदारांची संख्या 110 वरून 40 वर आली होती. त्यावेळी बी एस येदियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षालाही केवळ आठ जागांवर विजय मिळाला होता.

येदियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना का केली ? –

’येदि’ 30 मे 2008 ला दुसर्‍यांदा कर्नाटकचे सीएम बनले होते. तीन वर्षापर्यंत त्यांचे सरकार विनातक्रार चालले. 2011 मध्ये लोकायुक्तने अवैध खान प्रकरणाची चौकशी सुरू केली. यामध्ये येदियुरप्पा यांचेही नाव आले. पक्षश्रेष्टींनी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. त्यावेळी बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते नितीन गडकरी व त्यावेळी पक्षावर लाल कृष्ण आडवाणी यांचा पगडा होता.

लोकसभा निवडणुकीची तयारी करताना भाजपला कोणत्याही प्रकारचा वाद नको होता. त्यामुळे येदियुरप्पा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढवण्यात आला. येदियुरप्पा यांनी 31 जुलै 2011 मध्ये भाजपचा राजीनामा दिला व 30 नोव्हेंबर 2012 रोजी कर्नाटक जनता पक्ष नावाने स्वत:चा पक्ष स्थापन केला. यामुळे भाजप व ’येदि’ दोघांचेही नुकसान झाले.

पीएम मोदींचे कट्टर समर्थक येदि –

2014 च्या निवडणुकीआधी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार बनले व त्यांना येदियुरप्पा यांना भाजपमध्ये परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले. 2 जानेवारी 2014 रोजी येदि यांनी कर्नाटक जनता पक्षाचे भाजपमध्ये विलगीकरण करण्यात आले. येदी यांनी शिमोगा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली व 3 लाख 63 हजार 305 मतांनी ते विजयी झाले. त्याचबरोबर कर्नाटकात भाजपचे 12 खासदार निवडणून आले होते. यानंतर येदि नरेंद्र मोदींच्या जवळचे नेते बनले.

सवाल हा आहे, की 2021 मध्ये असे काय घडले की, बी एस येदियुरप्पा यांनी आपली गादी सोडाली लागली. 2023 मध्ये कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी भाजप नेतृत्वबदलाचे धाडस का करत आहे.? नव्या मुख्यमंत्र्यांनाही येदियुरप्पा यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

बीजेपीमध्ये ज्यांचे वय 75 वर्षे पूर्ण आहे, ते सर्व मार्गदर्शक मंडळात गेले आहे. 78 वर्षीय येदियुरप्पा याला अपवाद होते. पार्टीच्या स्टेट यूनिटमधील अनेक नेते येदियुरप्पा यांच्या कार्यशैलीवर नाराज होते. विशेष करून पार्टीचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष येदिंवर नाराज होते. राज्यात चर्चा सुरू होती, की ’बीएसवाय’ यांचा मुलगा बी. वाई. विजेंद्र कामकाजात हस्तक्षेप करत आहे. त्यांच्या मुलावर भ-ष्टाचाराचे आरोपही लावण्यात आले होते. 2023 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नवे नेतृत्व उभे करण्यास इच्छुक आहे.

येदि यांच्याविषयी काही अज्ञात गोष्टी –

2007 मध्ये ज्योतिषांच्या सल्ल्याने येदियुरप्पा यांनी आपल्या नावात एक लेटर ् अधिक जोडले होते. आधी त्यांचे नाव भ्ग्ब्ल्ीरज्ज्र होते, त्यानंतर त्यांनी ते भ्ब्ल्ीरज्ज्र असे बदलले. दरम्यान 2019 मध्ये त्यांनी आधी होते ते भ्ग्ब्ल्ीरज्ज्र पुन्हा लावले.

राजकारणात येण्याआधी येदियुरप्पा सोशल वेलफेयर डिपार्टमेंटमध्ये प्रथम श्रेणी क्लार्क होते. 1967 मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली व वीरभद्र शास्त्री यांच्या शंकर राइस मिलमध्ये लिपीक बनले.

वाय एस येदियुरप्पा यांना दोन मुले व तीन मुली आहेत. मोठ्या मुलाचे नाव राघवेंद्र तर दुसर्‍याचे नाव वाय विजेंद्र आहे. त्यांच्या मुलींची नावे अरुणा देवी, पद्मा देवी आणि उमा देवी आहे.

खान घोटाळ्यात येदियुरप्पा यांना 23 दिवस तुरुंगात रहावे लागले होते. लोकायुक्त कोर्टाच्या आदेशानुसार 15 ऑॅक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान ते तुरुंगात राहिले.

येदियुरप्पा यांना दोन वेळा कोविड-19 चे संक्रमण झाले व दोन्ही वेळी त्यांनी कोरोनावर मात केली.

येदिंचे आता काय होणार –

राजकीय क्षेत्रात चर्चा आहे की, येदियुरप्पा यांना राज्यपाल पदाचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यांनी तो धुडकावला आहे. जर ते कर्नाटकच्या राजकारणात सक्रीय राहतात तर त्यांची पुढची राजकीय चाल काय असेल याची उत्सुकता आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!