सीएमएफआरआय शास्त्रज्ञांला समुद्री शेवाळवरील शोधासाठी आयसीएआर पुरस्कार

कोच्ची प्रतिनिधी

17जुलै

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इस्टीटयुट (सीएमएफआरआय) च्या मुख्य शास्त्रज्ञ काजल चक्रवर्तीनी मधुमेहसह विविध जीवनशैली संबंधीत आजारावरील उपचारासाठी समुद्र शैवाळ पासून न्यूट्रास्यशुटिकल उत्पाद विकसीत करण्याच्या आपल्या शोधासाठी आपली राष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे.

काजल चक्रवर्तीना केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालया अंतर्गत कार्यरत भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) द्वारा स्थापित कृषी संशोधनातील उत्कृष्टतेसाठी प्रतिष्ठीत नॉर्मन बोरलॉग राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

तीन अन्य सीएमएफआयआर शास्त्रज्ञांनाही त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहे. सर्व पुरस्कार व्हर्च्युअलपणे केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमरद्वारा प्रदान करण्यात आले आहे.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर सभेला संबोधीत करताना मंत्री तोमर यांनी म्हटले की प्रासंगिक संशोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी आणि याच्या मजबूत पायाला मजबूत केले गेल्यास देशातील ग-ामीण विकासाच्या लक्ष्यांना प्राप्त करण्यास मदत मिळू शकते आहे.

यावेळी स्थानियस्तरावर कृषीला समर्थन देण्यासाठी आयटीसी आधारीत इंटरफेर समाधान शेतकरी सारथीचे विमोचन करण्यात आले.

पुरस्काराची घोषणा ही प्रत्येक पाच वर्षानंतर केली जाते आणि या अंतर्गत दहा लाख रुपयांचा नगदी पुरस्कार दिला जातो. या व्यतिरीक्त शास्त्रज्ञांना पाच वर्षासाठी एक आव्हानात्मक शोध योजना पूर्ण करण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचे शोध अनुदान दिले जाईल.

चक्रवर्तीच्या शोधामध्ये गाठीमुळे होणारे त्रास, टाइप-2 मधुमेह, डिस्लिपिडेमिया, उच्च रक्तदाब आणि हायपापेथायरायडिज्मला निपटण्यासाठी निवडक समुद्री शैवाळामुळे न्यूटास्युटिकल उत्पादनाचा विकास आणि व्यावसायीकरण सामिल आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!