कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड यांच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल

कल्याण प्रतिनिधी

कल्याणच्या प्रसिद्ध उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा | Case file against Kalyan  famous builder Sanjay Gaikwad over power theft | TV9 Marathi

13 जुलै

कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी 8 कोटी रुपये किमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीचा आरोप करत महावितरणाने त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जवळपास 34 हजार 640 रुपयांची वीज चोरी झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. महावितरणाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सदर रक्कम भरली असल्याचं महावितरणाकडून सांगण्यात आलं आहे. तर याप्रकरणी संजय गायकवाड यांनी मात्र हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी बोलताना माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जर वीजचोरी झाली असेल, तर मग मीटर का नेलं नाही? असा संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

संजय गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की, ‘वीजचोरी नसून तडजोडीचं बिल होतं, मीटरचा एक फेज जळाल्यानं महावितरणचे अधिकरी साईड व्हिजिट करण्यास आले होते. मीटरचा एक फेज बायपास असल्याचं त्यांचा निदर्शनास आलं, म्हणून महावितरणकडून तडजोडीचं बिल आकारण्यात आलं. परंतु, बिल आम्हाला मिळालं नव्हतं, माझी नाहक बदनामी केल्याप्रकरणी महावितरणाविरोधात अब-ुनुकसानीचा दावा करणार आहे.‘

काय आहे प्रकार?

महावितरणाच्या भरारी पथकानं कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागात बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरु असल्याचे आढळून आले. मार्चमध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रीतसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे 34 हजार 840 रुपयांचे देयक आणि 15 हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणार्‍या संजय गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम न भरल्याने महावितरणाने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीजचोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे 34 हजार 840 रुपयांचे देयक आणि तडजोडीची 15 हजार रुपयांची रक्कम सोमवारी महावितरणकडे भरली असल्याची माहिती मिळत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!