रांचीमध्ये होणार्या भारत-न्यूझीलँड टि-20 सामन्यात 50 टक्के दर्शकांची उपस्थिती असेल, राज्यातील रविवारच्या लॉकडाऊनला हटविले
रांची,
कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या कमीला पाहता झारखंड सरकारने शुक्रवारी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आगामी 19 नोंव्हेंबरला भारत व न्यूझीलँड क्रिकेट संघात खेळण्यात येणार्या टि-20 सामन्यात 50 टक्के दर्शकांना उपस्थित राहण्यास मंजूरी दिली गेली.
झारखंड राज्यात कोरोना स्थितीला पाहता मागील चार महिन्या पासून रविवारी लागू असलेल्या लॉकडाऊनला पूर्णपणे हटविले गेले आहे. राज्यातील लोकांना नदी आणि धरणांमध्ये काही अटीसह छठ पर्व साजरे करण्यास परवानगी दिली गेली.
शुक्रवारी संध्याकाळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपती व्यवस्थापन प्राधिकारच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले.
जेएससीए मैदानावर खेळण्यात येणार्या भारत -न्यूझीलँडमधील सामन्यांच्या वेळी दर्शकांच्या मैदानावरील प्रवेशा बाबतची संशयीत स्थिती निर्माण झाली होती. याच कारणामुळे सामन्यासाठी तिकीटाच्या विक्रीवरही निर्णय होऊ शकला नव्हता. आता सरकारच्या ताज्या निर्णयानुसार मैदानाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के दर्शकांना प्रवेशाची परवानगी दिली जाईल.
जेएससीए मैदानाची क्षमता 40 हजार दर्शकांची आहे याचा अर्थ 20 हजार लोकांना सामना पाहण्याचा आनंद घेता येईल. सामन्याच्या दरम्यान शारिरीक अंतर आणि कोविड मानदंडा बाबतची एक स्वतंत्र एसओपी प्रसिध्द केली जाईल.
झारखंडमध्ये सरकारने रविवारी काही आवश्यक सेवाना वगळता बाजार आणि दुकाने उघडण्यावर पूर्णपणे प्रतिबंध लावले होते. या प्रतिबंधानाही आता हटविण्यात आले आहे. या व्यतिरीक्त रात्री 8 वाजे पर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची कालमर्यादाही समाप्त केली गेली आहे.
आपती प्रबंधन प्राधिकारच्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्य मंत्री बन्ना गुंप्तानी मीडियाला सांगितले की राज्यातील सर्व शाळांमध्ये वर्ग 1 ते पाचवी पर्यंतच्या वर्ग सुुरु करण्यावर प्रतिबंध असेल. तर वर्ग दहावीच्या वरील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग वर्ग आता उघडले जातील.
सरकारने आता वैवाहिक सोहळ्यांमध्ये 500 लोकांना भाग घेण्याची परवानगी दिली आहे. मोठया क्षमता असलेले हॉलमध्ये 50 टक्क्यांपर्यंत जमा होण्यास परवानगी असेल.