महाराष्ट्र विधान मंडळ महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती चे सदस्य तथा शिक्षक आमदार मा.नागो गाणार साहेब यांची शेख अब्दुल रहीम सरांनी घेतली भेट!

विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्या बाबत सविस्तर चर्चा करून हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे केले निवेदन सादर…

औरंगाबाद (प्रतिनिधी)-

दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री औरंगाबाद च्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र विधान मंडळ महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती चे सदस्य तथा शिक्षक आमदार मा.नागो गाणार साहेब यांची भेट हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्य संघटक शेख अब्दुल रहीम सरांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून केले निवेदन सादर. या वेळी सर्वप्रथम शिक्षक आमदार मा.नागो गाणार साहेबांचे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे परंपरा नुसार शेख अब्दुल रहीम सरांनी पुष्पगुच्छ ना देता पुस्तक आणि शाल टाकून सत्कार केले व त्यानंतर विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक आमदार मा.नागो गाणार साहेबांनी ही समस्यांवर व सामाजिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले व लवकरच लवकर सर्व प्रश्न निकाली काढण्याचा मी प्रामाणिकपणे व योग्यतो पाठपुरावा करू असे आश्वासन ही दिले…

विद्यार्थी-शिक्षकांच्या खालील मुद्यांवर निवेदन सादर करण्यात आला…

१) मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी भारत रत्न डॉ. ए. पी जे कलाम यांच्या नावाने स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावा यासाठी आपण ही योग्यतो पाठपुरावा करावा ही विनंती.
२) २००५ नंतर नौकरीत लागलेलं राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यासाठी येत्या अधिवेशनात सर्व शिक्षक आमदारांनी एकजुटीने प्रयत्न करावे.
३) विनाअनुदानित,२०टक्के,४०टक्के अनुदानित शाळांना प्रचलित धोरणाने अनुदान मिळावो यासाठी सर्व शिक्षक आमदारांनी येत्या अधिवेशनात एकजुटीने एक ताकदीने मागणी लावून धरावी.
४) दिवाळी सुट्ट्यांचा घोळ त्वरित आपल्या स्तरावर सोडण्यात यावा.
५) १ ली ते १०वी पर्यंत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता व उपस्थिती भत्ता पूर्वी प्रमाणे सुरू करण्यास आपण योग्यतो पाठपुरावा करावा.
६) शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना सुरू करण्यास आपल्या परीने शासनाकळे योग्य पाठपुरावा करण्यात यावा.
आदी विषयांवर शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र विधान मंडळ महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समिती चे सदस्य मा.नागो गाणार साहेबांचे लक्ष वेधले व त्यांना निवेदनाद्वारे विनंती केली की आमच्या निवेदनावर त्वरित आपण आपल्या स्तरावर ठोस पाठपुरावा करावा व विद्यार्थी-शिक्षकांना न्याय देण्याचे काम आपण महाराष्ट्र राज्याचे शिक्षक आमदार या नात्याने करावे ही विनंती करण्यात आली. निवेदनावर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Varsha Gaikwad Bacchu Kadu
Nago Ganar Nago Ganar Nago Ganar
महाराष्ट्र राज्य जुनि पेंशन हक्क संघटन मुख्य ग्रुप
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,महाराष्ट्र राज्य

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!