उत्तर प्रदेश : जीका विषाणूने संक्रमित व्यक्तीचे कुटुंब निगेटिव्ह
कानपूर (उत्तर प्रदेश),
कानपूरमध्ये जीका विषाणूने संक्रमित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या संपर्कतील सर्व लोकांच्या नमुन्यांची तपासणी नकारात्मक (निगेटिव्ह) आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने अन्य 22 व्यक्तींचे नमुने गोळा केले होते जे कुटुंबातील सदस्य किंवा संक्रमिताच्या जवळच्या संपर्कात आहेत. परंतु अशा सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
आयुक्त राज शेखर यांनी संक्रमित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली आणि या प्रकरणात त्यांच्या जवळच्या संपर्क आणि ते आता पर्यंत कोठे कोठे फिरले, या सर्वांचा तपशिल घेतला.
वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आरोग्य अधिकार्यांची एका टिमने पोखरपूरमधील परदेवनपुरवाचा दौरा केला. येथे शनिवारी राज्यातील पहिला जीका विषाणूचा रुग्ण समोर आला आणि संक्रमणाच्या रोकथाम आणि उपचारासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा आढावा घेतला.
या दरम्यान जीकाच्या पहिला रुग्णावर एयरफोस स्टेशन रुग्णालयात उपचार सुरु आहे आणि डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
विभागीय आयुक्तांनी म्हटले की केंद्रिय आरोग्य मंत्रालयाची एक टिम आणि राज्य सरकारच्या अन्य टिमही कानपुरमध्ये आहेत आणि ते या प्रकरणाला गंभीरतेने पाहत आहेत.
ते म्हणाले की आम्ही डासांना एकत्र गोळा केले असून त्याना एक किंवा दोन दिवसांमध्ये डीएनए चाचणीसाठी राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (एनएमआरआय) दिल्लीकडे पाठविले जाईल. भारत सरकारची महामारी शास्त्रज्ञांची विशेष टिमही कानपूरला पोहचली आहे आणि ते या आजाराच्या मागील इतिहासाचा अभ्यास करतील.
त्यांनी म्हटले की भागांची स्वच्छता. डासाच्या प्रजननाच्या मैदानांची ओळख करणे आणि त्यांना स्वच्छ करण्या सारखे आवश्यक निवारक उपाय केले जात आहेत.
ते म्हणाले की आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य सरकारसाठी आरोग्य एक प्राथमिकता असलेले क्षेत्र आहे जे सर्वोत्तम आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधासाठी शक्य ते सर्व पावले उचलत आहेत.