बिहारमधील जनतेने तेजस्वीला मुख्यमंत्री बनविले होते परंतु नितिश कुमार धोक्याने बनले- लालू यादव

मुंगेर,

बिहारच्या जनतेने तेजस्वी यादवला मुख्यमंत्री बनविले होते परंतु धोक्याने नितीश कुमार मुख्यमंत्री बनले आहेत असा घणाघात बिहारमधील मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी बुधवारी केला.

बिहारमधील दोन विधानसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीतील प्रचार अभियानात राष्ट्रीय जनता दल (राजद) चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव बुधवारी स्वत: उतरले, त्यांनी तारापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार अभियानात सभेला संबोधीत करताना केंद्र व राज्याच्या सरकारवर टिका केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंगळवारच्या गोळी मारण्याच्या संबंधातील वक्ताव्यावर लालूनी म्हटले की ते काय गोळी मारतील ते स्वत:च मरतील.

तारापूरमध्ये जवळपास सहा वर्षानंतर प्रथमच निवडणुक सभेला संबोधीत करताना लालूनी म्हटले की तुम्ही लोकांनी तेजस्वी यादवला मुख्यमंत्री बनविले होते परंतु धोक्याने, बेईमानीने नितीश कुमार मुख्यमंत्री बनले आहेत. त्यावेळी मी जेलमध्ये होतो परंतु जर बाहेर असतो तर असे झाले नसते.

लालूनी म्हटले की आम्ही म्हटले होते की नितीश कुमार सरकारचे विसर्जन होत आहे. नितीश बोलत आहेत की आम्ही त्यांना गोळी मारावी. आम्ही त्यांना कशामुळे गोळी मारुत. तुम्ही स्वत:च मरतील.

बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसादच्या विसर्जनच्या वक्ताव्यावर म्हटले होते की विसर्जनाची गोष्ट तर सोडा लालूना वाटले तर ते गोळीही मारतील. ते हेच करु शकतात आणि अजून काही करु शकत नाहीत.

लालूनी मंगळवारी म्हटले होते की ते बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारचे विसर्जन करण्यासाठी दिल्लीहून बिहारला आले आहे. भाजपच्या राज्यामध्ये रेल्वे आणि जहाज बरोबर सर्वकाही विकले गेले. सर्वांचे बँक खाते उघडले गेले परंतु कोणाला काहीही मिळालेले नाही. बिहारमध्ये म्हणत आहेत की डबल इंजीनचे सरकार आहे. नितीश कुमार स्टिम इंजन आहेत आणि भाजप डिझेल इंजन आहे. दोघेही एकमेकांना ओढत आहेत.

ते म्हणाले की बिहारमधील लोक रोजगारासाठी परेशान आहेत. लोकांना एक तर काम मिळत नाही आणि कोणतेही विकास कार्य होत नाही.

लोकांना जातीनिहाय जनगणनेसाठी संघर्ष करण्याचे आवाहन करत लालूनी म्हटले की दलित आणि ओबीसींची संख्या वाढली आहे. जातीनिहाय जनगणनाची लढाई कोणत्याही स्थितीमध्ये सुरु होईल. देशामध्ये सर्व जनावरांची मोजणी होऊ शकते तर मनुष्यांच्या जातीची मोजणी कशामुळे होऊ शकत नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!