समीर वानखेडेंवर आरोप करणारे प्रभाकर साईल अडचणीत?, मीडियासमोर आई हिरावती साईल यांनी केला गौप्यस्फोट

मुंबई,

गेल्या काही दिवसांपासून मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी वेगवेगळे खुलासे होत आहेत. काल आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र आता प्रभाकर साईल यांच्या आईनं त्याहून मोठा गौप्यस्फोट केला आहे.

प्रभाकर साईलबाबत त्यांची आई हिरावती साईलनं धक्कादायक दावे केल्याचं समोर आलं आहे. टीव्ही 9 नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

प्रभाकर हा गेल्या चार महिन्यांपासून आमच्या संपर्कात नसल्याचं हिरावती साईल यांनी म्हटलं आहे. प्रभाकर कुठे राहतो, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रभाकरच्या आईनं टीव्ही 9 सांगितलं की, प्रभाकरला मी काय सांगणार, तो कुठे राहतो ते आम्हाला काही माहिती नाही. गेल्या चार महिन्यांपासून त्याने आमच्याशी संपर्कही साधलेला नाही. आमच्याशी बोललेला नाही. तसंच त्याने आमची विचारपूसही केलेली नाही. तसे कधी त्याने आम्हाला पाच पैसे दिलेलेही नाहीत. त्याचं आमच्याशी काही देणंघेणं नाही. येथे घरात असलेले कपडालत्ता तो घेऊन गेलाय, आता आमच्या इथं त्याचं काहीही नाही.

त्यानं जे काही गौप्यस्फोट केले त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नसल्याचं हिरावती साईल म्हणाल्यात.

आम्ही मुळचे कोकणातले असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहोत. प्रभाकर विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. मात्र त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसून मुलींना घेऊन माहेरी राहते, असं प्रभाकरच्या आईनं सांगितलं आहे.

प्रभाकर साईल यांनी र्‍ण्ँ च्या एका बड्या अधिकार्‍यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. केपी गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यात धक्कादायक म्हणजे त्यात 18 कोटींवर डील झाली आहे. हा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे.

प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकार्‍यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं. क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑॅक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑॅक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग-ीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!