राजस्थानमध्ये बलात्कार-हत्येतील आरोपीला गुन्ह्याच्या 24 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा
जयपूर
राजस्थानमध्ये सात वर्षीय बालीकेवर बलात्कार व तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी दिनेश जाटला गुन्हा घडल्याच्या 24 दिवसांच्या आतामध्ये शुक्रवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
डीजीपी एम.एल.लाथर यांनी म्हटले की गुन्ह्या बाबत माहिती 20 सप्टेंबरला मिळाली. आरोपी अल्पवयीन मुलीला भेट देण्याचे लालच देऊन आपल्या घरी घेऊन गेला होता. पीडिताच्या वडिलांनी तक्रार केली होती. यानंतर काही वेळातच तपास सुरु करण्यात आला आणि मुलीचे शव एका शेतामध्ये सापडले.
स्थितीच्या गंभीरतेला पाहता अजमेर रेंजच्या आयजी आणि अन्यंच्या नेतृत्वाखाली पोलिस टिम नागौरला पोहचली आणि पुरावे गोळा केले.
पोलिसच्या विशेष टिमने पुराव्याच्या आधारावर आरोपीला अटक करुन सहा दिवसात मेडता शहराच्या पॉक्सो न्यायालयात हजर केले.
अजमेर रेंज आयजीद्वारा स्पीक अप अभियाना अंतर्गत प्रकरणाची निवड केली आणि 28 सप्टेंबरला सुनवाई सुरु झाली
लाथर यांनी सांगितले की प्रत्येक दिवशी साक्षीदारांना बोलावले गेले आणि शेवटी 21 ऑक्टोबरला दिनेश गुंन्ह्यात दोषी आढळून आला आणि शुक्रवारी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली.