पाकिस्तानी महिलेशी चर्चा करूनच अमरिंदर यांच्याकडून मंत्र्यांची व्हायची नियुक्ती- नवज्योत कौर
अमृतसर,
काँग-ेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी, काँग-ेसच्या नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अरूसा आलम यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कॅप्टन अमरिंदर सिंग हे कोणत्याही मंत्र्यांची नियुक्ती करत नव्हते. एवढेच काय स्टेशन पोलीस अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्तीही आलम यांच्या संमतीशिवाय होत नसल्याचा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला.
नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, की अरुसा आलम यांचा मुलगा हा पैशांनी भरलेली सुटकेस घेऊन दुबईला पळून गेला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांचे वय पाहाता पुजेकडे वळायला हवे. त्यांनी उर्वरित आयुष्य हे अरुसा आलम यांच्यासोबत घालवावे.
अकाली दलाच्या नेत्यांकडून आलमला महागड्या भेटवस्तू
नवज्योत कौर म्हणाल्या, की अकाली दलाचे सर्व नेते हे आलम यांना भेटायला जाताना हिर्यांचा सेट घेऊन जात होते. पंजाबमधून सर्व पैसे घेऊन आलम ही दुबईला पळून गेली आहे. कॅप्टन यांनीही आलम यांच्यापाठोपाठ जावे व आयुष्य आनंदाने व्यतीत करावे, असेही त्यांनी म्हटले.
अमरिंदर सिंग यांच्याकडून नवज्योत सिंग यांच्या मतदारसंघावर अन्याय
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्याबाबत विचारले असता नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, की त्यांच्या पक्षाचा आमच्यावर कसलाही परिणाम होणार नाही. कॅप्टन यांच्या नेतृत्वात नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मतदारसंघावर भेदभाव झाला आहे. मात्र, नवज्योत सिंग हे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास करणार आहेत. नवज्योत सिंग सिद्धू हे पूर्व अमृतसरमधून निवडणूक लढविणार आहोत.
कोण आहे अरुसा आलम?
अरुसा आलम या संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला व कॅप्टन यांचे खास संबंध होते. पंजाबच्या राजकीय तसेच सांस्कृतिक वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते. आरुसा आलम यांनी 2006 मध्ये जालंधरमध्ये पंजाब प्रेस क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली होती.आरुसा यांचे वडील अकलीम अख्तर हे पाकिस्तानी राजकारणातील सुप्रसिद्ध चेहरे आहेत. आरुसा यांना दोन मुलेही आहेत. कॅप्टनने आपल्या ’द पीपल ऑॅफ द महाराजा’ या पुस्तकात अरुसाचा उल्लेख मित्र असा केला आहे.