हिमाचल प्रदेशमध्ये बेपत्ता 17 ट्रेकर्सपैकी 11 जणांचा मृत्यू, दोघे वाचले; 4 जणांचा शोध सुरु
किन्नौर,
हिमाचल प्रदेशात बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह 17 ट्रेकर्सच्या ग-ूपमधील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हे ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हवाई दलाने लमखागा खिंडीत मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केले आणि आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. हा ग-ूप 18 ऑॅक्टोबर रोजी प्रचंड हिमवर्षाव आणि खराब हवामानामुळे बेपत्ता झाला.
ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने 20 ऑॅक्टोबर रोजी बचाव कार्य सुरू केले. असं सांगण्यात येत आहे की, हे ट्रेकर्स 14 ऑॅक्टोबर रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशीला लागून असलेल्या हर्षिल येथून हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये चित्कुलसाठी रवाना झाले होते. पण ते 17 ते 19 ऑॅक्टोबर दरम्यान लमखागा खिंडीजवळून बेपत्ता झाले.
बेपत्ता ट्रेकर्सचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाचे तीन जवान तैनात करण्यात आले आहेत आणि लाईट हेलिकॉप्टरने उंच डोंगरावर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑॅक्टोबर रोजी एींइच्या सदस्यांनी 4 मृतदेह बाहेर काढले होते. याचदरम्यान, 22 ऑॅक्टोबर रोजी अथ्प् ने एका वाचलेल्या व्यक्तीची सुटका केली आणि 16500 फूट उंचीवरुन 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित चार जणांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अधिकार्यांनी मृतदेह स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले असून वाचलेल्यांना हर्षिल येथे प्राथमिक उपचारानंतर उत्तरकाशी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणच्या आठ पर्यटकांची टीम 11 ऑॅक्टोबर रोजी मोरी सांक्रीच्या ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून हर्षिलला रवाना झाली होती. 13 ते 21 ऑॅक्टोबर दरम्यान लामखागाजवळ ट्रेकिंगसाठी या टीमने वन विभाग, उत्तरकाशी यांच्याकडून इनर लाईन परमिटही घेतले होते. 17 ते 19 ऑॅक्टोबरदरम्यान खराब हवामानामुळे ही टीम भरकटली. ट्रेकिंग टीमशी कोणताही संपर्क न झाल्यानं सुमित हिमालयन ट्रेकिंग टूर एजन्सीने उत्तराखंड सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारला पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कळवलं. किन्नौर जिल्हा प्रशासनाला बुधवारी ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली.
दिल्लीच्या अनिता रावत (38), पश्चिम बंगालचे मिथुन दारी (31), तन्मय तिवारी (30) , विकास मकल (33) सौरभ घोष (34) सावियन दास (28), रिचर्ड मंडल (30) सुकन मांझी (43) अशी टीम सदस्यांची नावे आहेत. तर स्वयंपाक करणार्या कर्मचार्यांची ओळख देवेंद्र (37), ज्ञानचंद्र (33) आणि उपेंद्र (32) अशी आहे, जे उत्तरकाशीतील पुरोलाचे रहिवासी आहेत.