कर्नाटक : पोलिसांना अपशब्दचा वापर केल्याच्या आरोपामध्ये बजरंग दल नेत्यासह 100 हिंदू समर्थक कार्यकर्त्यांच्या विरोधात एफआयआर
हुबळी
कर्नाटक पोलिसांनी बजरंग दलाचा नेता आणि हिंदू संघटनेच्या 100 कार्यकर्त्यांच्या विरोधात हुबळीतील धर्मांतरणाच्या विरोधात डयूटीवर तैनात एका आयपीएस अधिकार्याला शिव्या दिल्याच्या आरोपात प्राथमिकी नोंदवली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पोलिसांनी बजरंग दलाचे नेते अशोक अन्वेकर आणि अन्य जणांवर 17 ऑक्टोबरला विरोध प्रदर्शन करताना पोलिस उपायुक्त (कायदा व्यवस्था) चे रामराजन यांना अपशब्द म्हटल्याच्या आरोपात गुन्हा नोंदविला गेला आहे. रामराजन यांनी या संबंधात अन्य पोलिस अधिकार्या बरोबर तक्रार नोंदविली आहे.
अन्वेकर आणि अन्यनी धर्म परिवर्तनामध्ये सामिल व्यक्तींच्या अटकेची मागणी करत पोलिस ठाण्याच्या समोर विरोध प्रदर्शन केले होते. आंदोलनकर्त्यांनी रामराजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांना देशद्रोही म्हटले. त्यांनी घोषणा दिली की अधिकारी पोलिस विभागाची बदनामी करेल
आंदोलनकर्त्यांनी धमकी दिली की जर रामराजन यांची बदली करण्यात आली नाही तर ते पोलिस आयुक्त कार्यालयाला जप्त करतील. त्यांनी रामराजनला फटकारत म्हटले की ते धर्म परिर्वनामध्ये सामिल लोकांचे समर्थन करत आहेत.
पोलिस सूत्रांनी म्हटले की विरोध प्रदर्शन पोलिसांच्या परवानगी विना आयोजीत करण्यात आले होते.