उत्तर प्रदेश : पोलिस प्रकरणात निषादांचे भगवान रामाकडे न्यायाची मागणी
अयोध्या,
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवाशी सोमनाथ निषाद हे बॅर्नर आणि फलक घेऊन अयोध्याला पोहचले व पोलिस अत्याचारा पासून न्याय देण्यात मदत करण्याची भगवान रामाकडे याचना केली.
बस्तीहून अयोध्या पर्यंत पायी 70 किलोमीटरचा प्रवास करुन आलेले सोमनाथ निषाद यांनी पत्रकारांना सांगितले की स्थानिय पोलिसांनी त्यांच्या विरोधात बनावट गुन्हेगारी प्रकरण नोदविले आहे.
त्यांनी म्हटले की मी प्रत्येकाकडे गेलो परंतु कोणीही माझी मदत केली नाही आणि मला तेथे न्याय मिळण्याची कोणतीही आशा उरलेली नाही. यामुळे मी भगवान रामाकडे आलो आहे. कारण ते सर्वशक्तीमान आहेत आणि मला विश्वास आहे की मला येथे न्याय मिळेल.
निषाद यांनी सांगितले की या वर्षाच्या सुरुवातीला आमच्या गावात अन्य काही रहिवांश्या बरोबर किरकोळ हाणामारी झाली आणि तत्कालीन उपनिरीक्षक दीपक सिंहनी माझ्या विरोधात प्रतिस्पर्धी समुहाच्या इशार्यावरुन गुन्हा नोंदविला.
त्यांनी म्हटले की पोलिसांनी माझ्यावर गोंडा अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे आणि मी सर्व पोलिस अधिकार्यांना आपल्या प्रकरणाची समीक्षा करण्याची याचना केली परंतु कोणीही असे केलेले नाही.
निषाद यांनी आरोप केला की सिंहनी त्यांना 20 हजार रुपये देण्यास सांगितले होते. परंतु मी ही रक्कम देऊ शकलो नाही त्यामुळे पोलिस अधिकार्यांने त्यांना अटक करुन जेलमध्ये पाठविले.
एक मुलगी आणि तिच्या कुटुंबातील आठ लोकांना बनावट प्रकरणात अटक केल्यानंतर सिंहला सेवेतून बरखास्त करण्यात आले आहे. प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर सिंहंच्या विरोधात कारवाई केली केली.