हस्तकला कारागीर आणि पारंपरिक कलांना बळकटी देण्यासाठी वाराणसीमध्ये खादी प्रदर्शन आणि खादी कारागीर परिषदेचे उद्घाटन
वाराणसी,
वाराणसीमध्ये आयोजित ,20 भारतीय राज्यांमधील उत्कृष्ट हस्तनिर्मित उत्पादनांचा समावेश असणार्या अत्याधुनिक खादी प्रदर्शनाचे उद्घाटन, केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री श्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी आज केले.
खादी आणि ग-ामोद्योग आयोगाने ‘खादी कारागीर संमेलन‘ (खादी कारागीर परिषद) ही आयोजित केली होती. या परिषदेला वाराणसी आणि प्रयागराज, जौनपूर, मिर्झापूर, गाझीपूर, सोनभद्र इत्यादी शेजारील 12 जिल्ह्यातील सुमारे 2000 खादी कारागीर, मुख्यत: महिला उपस्थित होत्या.
विविध राज्यांतून आलेल्या खादी संस्थांनी या प्रदर्शनात एकूण 105 स्टॉल उभारले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये वाराणसी हे विविध खादी उपक्रमांचे केंद्र म्हणून उदयाला आले आहे, असे राज्यमंत्री वर्मा यांनी सांगितले. सूत कताई, विणकाम, मधुमक्षिकापालन आणि कुंभारकाम यासारख्या जवळजवळ सर्व ग-ामीण आणि पारंपरिक कलांना येथे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात आले आहे, यामुळे कारागिरांना स्वयंरोजगाराचे साधन निर्माण झाले असून ते आत्मनिर्भर झाले आहेत. या प्रदर्शनामुळे या कारागिरांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, पंतप्रधानांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीने खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कारागिरांना पाठबळ देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. वाराणसीमध्ये सध्या 134 खादी संस्था कार्यरत आहेत, या संस्थांमध्ये एकूण कारागिरांपैकी 80म महिला आहेत.