बुलडाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार, रुग्णालयाबाहेरच झाली दोन महिलांची प्रसूती, डॉक्टर कर्मचारी गैरहजर

बुलडाणा,

बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या संग-ामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार समोर आला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या दोन गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णालयाबाहेर झाली असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. एका महिलेची रिक्षामध्ये तर दुसर्‍या महिलेची आरोग्य केंद्राच्या बाजूच्या एका घरात प्रसूती करण्यात आली असल्याने गावातील नागरिकांनामध्ये रोष निर्माण झाला आहे.

रुग्णांना सोयीसुविधा मिळाव्या यासाठी शासनाने तालुक्यातील संग-ामपूर सह सोनाळा, वानखेड, पातूर्डा या 4 गावात प्राथमिक आरोग्य केंद्र तर वरवट बकाल येथे ग-ामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे. मागील कित्येक वर्षांपासून ग-ामीण रुग्णालयासह चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात 35 पदे रिक्त असल्याने गरोदर महिलांसह इतर रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.

15 ऑॅक्टोबर रोजी संग-ामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री येथीलच एक महिला प्रसूतीसाठी आली. रुग्णालयात यावेळी एकही अधिकारी व कर्मचारी हजर नव्हता. त्या महिलेला खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत असल्याने आरोग्य केंद्राच्या बाजूच्या एका घरात प्रसूती करण्यात आली. या प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील 28 गावे जोडलेली असून त्यामध्ये पळशी, झाशी, पंचाळा, उमरा, वकाना, रुदाना, निवाणा, चांगेफळ, अकोली, बोळखा, तामगाव, भिलखेड, मानारडी, उकळगाव, पिंप्री यासह आदी गावे जोडलेली आहेत.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी कार्यरत असताना रात्रीच्या वेळी एकही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने रुग्णांची व विशेष गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. एक दिवसाआधी 14 ऑॅक्टोबर रोजी वरवट बकाल येथील ग-ामीण रुग्णालयात सुद्धा एकही डॉक्टर हजर नसल्याने काकणवाडा येथील एका महिलेची प्रसूती रुग्णालयाबाहेर रिक्षातच झाल्याची घटना घडली. आरोग्य केंद्र बरेच वेळा रात्री बंद असल्यामुळे रुग्णांना खूप त्रास होत असून याकडे वरीष्ठ अधिकार्‍यांसह रुग्ण कल्याण समितीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची ओरड रुग्ण करीत आहे.

चारही प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग-ामीण रुग्णालयात 35 पदे रिक्त आहेत. वरवट बकाल येथील ग-ामीण रुग्णालयात मंजूर 27 पदांपैकी 12 पदे रिक्त, संग-ामपूर आरोग्य केंद्रात 16 पैकी 7 पदे रिक्त, सोनाळा 14 पैकी 5 पदे रिक्त, वानखेड 15 पैकी 6 पदे रिक्त,पातूर्डा 16 पैकी 5 पदे रिक्त असून त्यामध्ये 7 वैद्यकीय अधिकारीसह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, औषध निर्माता आदींचा समावेश आहे.

गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई होणार

तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद रोजतकर यांनी सांगितलं की, कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. संग-ामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वेळेवर आले नाही. अशी फोनवरून तक्रार माझ्याकडे आली असून कामचुकार व कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असं डॉ प्रमोद रोजतकर यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!