आसाममधील पोटनिवडणुकीच्या सर्व जागा भाजप जिंकेल – हिमंत सरमा

गुवाहाटी,

आसाममध्ये 30 ऑक्टोंबरला होणार्‍या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये  सत्ताधारी भाजप व सहयोगी पक्ष सर्व जागा जिंकेल असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमानी शुक्रवारी व्यक्त केला

आसाममध्ये 30 ऑक्टोंबरला होणार्‍या पाच जागांवरील पोटनिवडणुकीतील दोन जागांवर काँग-ेसने विजय मिळविला होता. त्यांचे तत्कालीन सहयोग यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) ने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला होता. भाजपचा सहयोगी युनाइटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) ला एक जागा मिळाली होती

मुख्यमंत्री सरमा शुक्रवारी काँग-ेसमधून भाजपमध्ये सामिल झालेले नेते सुशांत बोरगोहेन बरोबर होते आणि बोनगोहेन यांनी यावेळी थौरा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

मुख्यमंत्री सरमानी म्हटले की भाजप आणि त्यांचा सहयोगी यूपीपीएल सर्व पाच जागांवार सहजपणे विजय मिळवेल. बोरगोहेने तिसर्‍यांदा शिवसागर जिल्ह्यातील थौरातून भाजपचे उमेदवाराच्या रुपात जिंकतील.

थौरातून दोन वेळा काँग-ेसचे आमदार राहिलेले बोरगोहेन यांनी नुकतेच काँगेसचा राजीनामा दिला व भाजपमध्ये सामिल झाले होते. मरियानीतून चार वेळा काँग-ेसच्या आमदार राहिलेल्या रुपज्योति कुर्मी, त्याही काँग-ेसला सोडून नकुतेच भाजपमध्ये सामिल झाल्या होत्या . त्यांनी शुक्रवारी भाजपचे उमेदवार म्हणून मरियानी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज भरताना कुर्मी बरोबर मुख्यमंत्री बिस्वा, केंद्रिय मंत्री रामेश्वर तेली आणि राज्याचे दोन मंत्री बोस आणि पीयूष हजारिकाही उपस्थित होते.

आसाममधील गोसाईगाव, तमुलपुर, थौरा, भबनीपुर आणि मरिसानी या पाच विधानसभा मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी  30 ऑक्टोंबर मतदान होणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या अन्य उमेदवारांमध्ये यूपीपीएलचे जिरोन बसुमतारी (गोसाईगाव), काँग-ेसचे भास्कर दहल (तमुलपूर) आणि माकपाचे कृष्णा गोगोई (थौर) यांचा समोवश आहे. या निवडणुकीतील मतमोजणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!