काश्मीरमध्ये शिख समुदायाने मृतक मुख्याध्यापिकेच्या अंत्यसंस्कारा दरम्यान मिरवणुक काढली
श्रीनगर,
शाळेच्या मुख्याध्यापिका सुपिंदर कौर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिख समुदयाने काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मृतक सुपिंदर कौर यांच्या पार्थिवासह त्यांच्या निवासस्थाना पासून ते अलोची बागे पर्यंत शुक्रवारी एक मिरवणुक काढली व आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले.
शिख समुदायातील सदस्यांनी सुपिंदर कौरसाठी न्याय आणि त्यांच्या हत्यांराना शिक्षा देण्याची मागणी केली. कौर अशा दोन शिक्षकांमध्ये सामिल होत्या ज्याची गुरुवारी श्रीनगरमधील ईदगाहमध्ये त्यांच्या शाळेत दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
शिखांनी मागणी केली की खोर्यात धार्मिक नेता आणि मत मांडणार्या अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलावीत आणि हस्तक्षेप करावा.
अंत्यसंस्कारामध्ये सामिल होणार्यांपैकी एकाने म्हटले की त्यांना कशामुळे मारले कारण त्यांनी फक्त झेंडा फडकविला, निर्दोषाना कशामुळे निशाना बनविले जात आहे, अल्पसंख्याक येथे सुरक्षीत नाहीत.
शाळेत दहशतद्यांनी मारलेल्यांपैकी दीपक चंद हे अजून एक शिक्षक होते. दीपक यांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या देशा बरोबर उभे राहण्यासाठी आपल्या प्राणांची किंमत चुकवली.
चंद यांच्या एका नातेवाईकाने म्हटले की सरकारलाही दोषी ठरविले गेले पाहिजे कारण त्यांनी सर्वांसाठी सुरक्षेचे आश्वासन दिले होते.
काश्मीरमध्ये मागील काही दिवसांमध्ये अनेक नागरीकांना निशाना बनविले गेले आहे आणि लक्षीत हल्ल्यांच्या कारणामुळे खोर्यात अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षा वाढली आहे.