महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यू मागील सत्य समोर येण्याचा विश्वास – बलबीर गिरी
प्रयागराज (उत्तर प्रदेश),
माझे गुरु महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूचा तपास करणार्या तपास संस्था खूप लवकरच सत्याला समोर आणतील असा मला विश्वास असल्याचे मत बाघंबरी मठाचे नतुन महंत बलबीर गिरीनी व्यक्त केला.
बाघंबरी मठाचे नतुन मठाधिपती म्हणून अभिषेक झाल्यानंतर प्रथमच प्रसार माध्यमांशी बोलताना गुरुवारी बलबीर गिरीनी म्हटले की मी आमचे गुरु नरेंद्र गिरींच्या आकस्मिक निधनाने खूप दुखी आहे याच कारणामुळे प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले होते. मला विश्वास आहे की सत्य लवकच समोर येईल.
मठ प्रमुखाच्या रुपात बलबीर गिरीना मंगळवारी अभिषेक करण्यात आला होता. त्यांनी प्रतिष्ठीत मठाचे दैनिक कामकाज कसे केले जाईल हे सांगत म्हटले की मी एक दिगंबर संन्यासी असून मागील 18-20 वर्षा पासून सनातन परंपरांचे पालन करत आहे. मी आपले निर्णय आखाडयाच्या आपल्या वरिष्ठ संतांच्या समोर मांडेल आणि त्यांचे मार्गदर्शन घेईल आणि जर योग्य असेल तर ते माझ्या निर्णयाला आशीर्वाद देतील.
निरंजनी आखाडयाचे सचिव महंत रवींद्र पुरीनी या आधी घोषणा केली होती की पाच सदस्यीय पर्यवेक्षी बोर्ड मठाच्या कामकाजाची देखरेख करेल जो निरंजनी आखाडाचा भाग आहे. जमिन विकणे किंवा खरेदी सारख्या सर्व मोठया निर्णयासाठी बलबीर गिरीना पाच सदस्यीय प्राशासनिक शाखेची मंजूरी घ्यावी लागेल.
रवींद्र पुरींच्या व्यतिरीक्त अन्य सदस्यांमध्ये महंत दिनेश गिरी, महंत ओंकार गिरी, केशव पुरी आणि महंत हर गोविंद पुरींचा समावेश असेल.
बलबीर गिरीनी पुढे म्हटले की मी संतांचा आशीर्वाद मागितला आहे आणि त्यांना आपल्या गुरुच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे यामुळे मठाचे कामकाज माझे गुरुच्या कालावधी सारखेच सामान्यपणे चालू शकेल.
निरंजनी आखाडया बरोबरील आपले संबंध आणि अखाडया बरोबर संतुलन कसे ठेवाल असे विचारले असता बलबीर गिरीनी म्हटले की संतुलन शोधण्याचा कोणताही प्रश्न नाही मी आखाडयाचा हिस्सा असून मीही आखाडयांच्या पंच परमेश्वर सदस्यांपैकी एक आहे. मी मठाच्या चांगल्यासाठी काम करेल.