त्रिपुरामध्ये भाजपचे आमदार दासानी प्रायश्चित म्हणून मुंडन केले, पक्षही सोडला
कोलकाता,
त्रिपुरातील सुरमा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष (भाजप) चे आमदार आशीष दास यांनी कालीघाट मंदिरामध्ये पूजा केली आणि भाजप सारख्या सांप्रदायीक पक्षामध्ये राहिल्याचे प्रायश्चितच्या रुपात मुंडन केले व नंतर आपण पक्ष सोडत असल्याची घोषणाही केली. दास हे तृणमुल काँग-ेसमध्ये सामिल होण्याची जोरदार अफवाह आहे परंतु दास यांनी आपण कोणत्या पक्षात सामिल होणार आहोत हे सांगितले नाही.
भाजप सांप्रदायिक राजकिय पक्ष असल्याचे म्हणत दास म्हणाले की भाजपने अनेक आश्वासने दिली परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. लोक 25 वर्षाच्या डाव्या पक्षांच्या शासनाला समाप्त करु इच्छित होते आणि मी ही यापैकी एक होतो. कारण मला वाटले की हे लोकांच्या भलाईसाठी काम करतील. मी त्रिपूरातील लोकां बरोबर चूकीचे केले आणि यासाठी मी तपस्या करण्याचा निर्णय केला आहे.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जाीं बाबत बोलताना एका शेतकरी कुटुंबातून आलेले आमदार दास यांनी म्हटले की जर ममता पंतप्रधान झाल्यास हे बंगालसाठी न्याय असेल आणि दशकांच्या चूकीला दूर करेल. हे सर्व बंगालींसाठी गर्वाची गोष्ट असेल आणि इंदिरा गांधीनंतर एक महिला देशात सत्ता संभाळेल.
तृणमुल काँग-ेसमध्ये सामिल होण्या बाबत विचारले असता दास यांनी म्हटले की मी येथे कोलकातामध्ये आहे कारण भारताला भाजप सारख्या सांप्रदायीक पक्षा पासून वाचविण्यासाठी पूर्ण देश ममतांकडे पाहत आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुक परिणामानंतर ममता बॅनर्जी नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी एक मजबूत दावेदाराच्या रुपात पुढे आल्या आहेत. माझे व्यक्तीगत मत आहे की फक्त ममता बॅनर्जीच आहेत ज्या भारताला भाजप पासून मुक्त करु शकतात. मी येथे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो आणि लवकर गोष्टी स्पष्ट होतील.
त्यांनी दावा करत म्हटले की मी अजून पर्यंत ममता बॅनर्जाींना भेटलो नाही परंतु त्यांनी ममता बॅनर्जाींचा पुतण्या आणि अखिल भारतीय तृणमुल काँग-ेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जीसह आपल्या प्रवासाच्या अंदाजानाही फेटाळलेही नाही आणि स्विकारलेही नाही. ते म्हणाले की लवकच तुम्हांला सर्व काही माहिती पडेल.
18 वर्ष डाव्या पक्षांच्या विरोधात आपली लढाई लढण्यासाठी ओळखले जाणारे आशीष दास यांनी 2023 मध्ये त्रिपुरामधून भाजपला पराभूत करण्याचा संकल्प केला आहे.