मुलाच्या विरोधात पुरावा मिळाल्यास मंत्री पद सोडेल – अजय मिश्रा
लखीमपुर ख्रीरी (उत्तर प्रदेश),
लखीमपुर खीरीमध्ये घडलेल्या घटनेत आशीष मिश्राचे घटना स्थ्ळावर उपस्थित असल्याचा एक जरी पुरावा कोणीही सादर केला तर आपण केंद्रिय मंत्री पदाचा राजीनामा देऊत असे मत केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टोनीनी व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना मिश्रांनी म्हटले की रविवारी जेथे ही घटना घडली त्या ठिकाणावर जर माझा मुलगा उपस्थित असल्याचा एक जरी पुरावा समोर आला तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईल.
लखीमपुर खीरीमध्ये रविवारी शेतकर्यांच्या विरोध प्रदर्शनाच्या दरम्यान झालेल्या हिंसेमध्ये चार शेतकर्यांसह नऊ लोकांचा मृत्यू झाला. शेतकरी संघटनानी दावा केला की आशीष मिश्रासह एका कारने विरोध करत असलेल्या शेतकर्यांना चिरडले.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यांच्या रविवारी तिकुनिया दौर्याच्या आधी विरोेध प्रदर्शन सुरु झाले. तिकुनिया हे अजय मिश्रांचे मूळ गाव आहे.
मंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशीषने दावा केला की प्रदर्शनकर्त्यांनी गाडयांच्या ताफ्यावर हल्ला केला आणि एका चालक आणि दोन भाजप कार्यकर्त्यासह अन्य तिघांची हत्या करण्यात आली.
अजय मिश्रांनी म्हटले की आमचे स्वयंसेवक आमच्या मुख्य अतिथींच्या स्वागतासाठी गेले होते आणि मी त्यांच्या बरोबर होतो. त्याचवेळी काही असामाजीक तत्वांनी गाडयांवर हल्ला केला. या दरम्यान कार चालकांला जखम झाली आणि तो संतुलन गमवून बसला याचा परिणामस्वरुप कार पलटली गेली.
आशीष मिश्राच्या विरोधात हिसेंच्या अंतर्गत प्राथमिकी नोंदवली गेली आहे. या दरम्यान आशीष मिश्राने म्हटले की पोलिसांनी अजून पर्यंत माझ्याशी संपर्क केलेला नाही आणि माझी भेटही घेतली नाही.