औरंगाबाद येथे आयुर्वेदाच्या एमएससाठी प्रयत्न करु-डॉ.भागवत कराड

औरंगाबाद,

औरंगाबाद हे पर्यटनस्थळ आहे. येथे आयुर्वेदाचा एमएसचा अभ्यासक्रम व्हावा. यासाठी मी प्रयत्न करीन असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.

औरंबाद येथे आयुर्वेद सभागृहात कोव्हीडच्या काळात उत्तम कामगिरी करणार्?या आयुर्वेद चिकित्सक, डॉ.वैद्यकीय अधिकारी तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचा डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागत कराड यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्ष डॉ.संतोष रंजेळकर, सचिव डॉ.भागवत गाडे, डॉ.श्रीकांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप कुलकर्णी, डॉ.सुभाष भोयर, डॉ.आनंद वैद्य, डॉ.संतोष शास्त्री यांच्यासह इतर डॉ.उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!