ड्रग्स खरेदी करण्यासाठी रक्त विकणार्‍या तरुणांनाकडून पाटण्यात मोठया रॅकेटचा खुलासा

पाटणा,

पाटण्यातील चार जवळचे मित्र ड्रग्स खरेदी करण्यासाठी रक्त विकत होते आणि जिल्हा रुग्णालयात दिर्घकाळा पासून सुरु असलेल्या रॅकेटची पोलिसांना माहिती मिळाली असून यातील चार तरुणांपैकी एकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पर्यंत पोहचून घोटाळ्याचा खुलासा केला. तरुणानुसार ड्रग्सच्या आहारी गेलेले अधिकांश तरुण आपल्या सवयीना पूर्ण करण्यासाठी रुग्णालयाला आपले रक्त विकतात.

नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ मनारेंजन भारतीनी म्हटले की हे चार युवक लहानपणा पासून मित्र होते आणि कदमकुआं भागातील एका प्रमुख शाळेत एकत्र शिकले होते. शाळेतील दिवसां पासून ते मादक पदार्थाच्या सवयीमध्ये अडकले गेले. ते पॉकेट मनीचा उपयोग करुन प्रतिबंधीत पदार्थ खरेदी करत होते. एकदातर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती पडले की ते नशा करतात. यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्याना पॉकेट मनी देणे बंद केले.

भारतीने म्हटले की पैश्यांच्या कमीचा सामना केल्यानंतर त्यांनी मादक पदार्थ खरेदी करण्यासाठी विविध भागांमध्ये मोबाईलला हिसकावण्यास सुरु केले. स्नॅचिंगसाठी त्यांना सहा महिन्यापूर्वी अटक करण्यात आली आणि जेलची शिक्षा झाली. जमानतीवर मुक्त झाल्यानंतर त्यांनी मोबाईल हिसकावणे बंद केले.

भारतीनी म्हटले की तीन युवकांच्या निवेदनानुसार ते पाटण्यातील कंकडबाग भागातील एका खाजगी रुग्णालयातील एका कर्मचार्‍याच्या संपर्कात आले. त्यांने या सर्वांना रुग्णालयात आपले रक्त विकणे आणि प्रति युनिट 1 हजार रुपये कमविण्याचे सांगितले. त्यांच्यासाठी पैसा कमविण्याचा हा मुफ्त पर्याय होता आणि त्यांनी याला नियमितपणे करणे सुरु केले होते. असे करताना ते कंकडबाग भागातील अन्य चार रुग्णालयाच्या संपर्कात आले.

भारतीनी म्हटले की रक्ताची विक्री आणि ड्रक्सचे सेवन मृत्यू झालेल्या मित्रामध्ये घातक झाले. मित्राच्या मृत्यूनंतर अन्य तिघे घाबरले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यही घाबरले. त्यांनी याना तीन आठवडयापेक्षा अधिक काळा पर्यंत आप आपल्या घरातील खोल्यांमध्ये बंद केले आणि त्यांना बाहेर जाऊ दिले नाही. परिणामस्वरुप ते कसे बसे नशेतून बाहेर पडण्यात यशस्वी राहिले.

त्यांनी म्हटले की ज्या रुग्णालयामध्ये रक्ताची अवैध खरेदी केली जाते अशा रुग्णालयांचे त्यांनी नावे सांगितले आहेत. त्यांच्या विरोधात पुढील कारवाई करण्यासाठी आमच्या विभागा बरोबरच आरोग्य विभागातील शीर्ष अधिकार्‍यांना रिपोर्ट दिला जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!