इंदौरमधील हॉटेलमध्ये अर्धा ग्लास पाणी दिले जाणार

इंदौर,

मध्य प्रदेशची व्यापारी नगरी इंदौरची ओळख नवीन करणारे शहर म्हणून निर्माण होत आहे. आता या शहरात जल संरक्षण आणि बचतीसाठी अभिनव प्रयोग केला जाणार आहे. याक्रमात येथील हॅटेलमध्ये आता ग-ाहकांना अर्धा ग्लास पाणी दिले जाणार आहे.

इंदौर शहरात नुकतेच जलहठचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाण्याच्या संकटावर चर्चा झाली. याच बरोबर पाण्याचे संरक्षण कसे केले जावे यावर संवाद केला गेला. सर्वांनी पाण्याच्या नासाडीला रोखण्यावर जोर दिला आणि जल स्त्रोताना वाचविण्या बाबत मते मांडली.

यावेळी हॉटेल असोसिसएशनचे सुमित सूरीनी घोषणा केली की जलहठ जल अभियानामध्ये सुरुवातीच्या फेरीत प्रत्येक हॉटेलमध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरुवात केली जाईल.

ओजरा फाउंडेशनद्वारा आयोजीत जलहठ कार्यक्रमाला संबोधीत करत राज्याचे जल संसाधन मंत्री तुलसीराम सिलावट यांनी म्हटले की राज्य सरकार जल संरक्षण आणि जल वाचविण्यासाठी संकल्पबध्द आहे. राज्य सरकारद्वारा या दिशेमध्ये लोकंमध्ये जागृती आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यासाठी सहयोग दिले जात आहे.

जलहठच्या माध्यमातून इंदौर जिल्ह्यातील शहरी व ग-ामीण भागात जलसंरक्षणा बाबत सतत काम केले जाईल. या कामात समाजातील सर्व वर्गाना जोडण्याचे काम होत आहेत. या कार्यक्रमात राज्यस्तरीय कोविड सल्लागार समितीचे सदस्य डॉ.निशांत खरेनी म्हटले की देशात चेन्नई, बेंगलोर सारख्या शहराना पाण्यासाठी तळमळताना पाहिले गेले आहे. इंदौरमध्ये ही स्थिती येऊ नये यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत.

त्यांनी म्हटले की ओजस फउंडेशनच्या माध्यमातून जल संरक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले जाईल तसेच समाजातील सर्व वर्गाना यामध्ये जोडले जाईल. जल संरक्षणाच्या क्षेत्रात शहरी आणि ग-ामीण भागात सतत काम करण्याची जरुरी आहे.

कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रतिनिधीनी जल संरक्षण क्षेत्रात काय नवीन केले जाऊ शकते आहे या संबंधात सल्ला दिला. प्रमुख्याने म्हटले गेले की धरणांना अतिक्रमण मुक्त केले जावे. सामान्य जनतेमध्ये जनजागृति आणली पाहिजे आणि शिक्षण संस्थामधून युवकांना जागृत केले जावे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!