ऑॅर्डर घेण्यास उशीर केल्याने कर्मचार्याला भयंकर शिक्षा; हॉकी स्टीकने मारहाण केली अन्
गोरखपूर,
ऑॅर्डर घेण्यास उशीर केल्याच्या कारणातून काही गुंडानी वाईन शॉपमधील कर्मचार्याला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी केलेल्या अमानुष मारहाणीत संबंधित कर्मचार्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही संतापजनक घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील आहे. मनीष प्रजापती असं हत्या झालेल्या कर्मचार्याचं नाव असून तो गोरखपूर येथील मॉडेल शॉप नावाच्या वाईन शॉममध्ये काम करत होता. दरम्यान गुरुवारी रात्री उशीरा आलेल्या काही गुंडानी प्रजापती यांना बेदम मारहाण केली आहे. मृत प्रजापती यांनी आरोपींची ऑॅर्डर घेण्यास उशीर केल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
आरोपींनी डीएव्ही पदवी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी नेत्याचं नाव घेत, गुंडांनी कर्मचार्याला मारहाण केली. आरोपींनी हॉकी स्टीकच्या साह्याने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मृत प्रजापती हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी दुकानातीन अन्य कर्मचार्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान मनीष यांनी अखरेचा श्वास घेतला. किरकोळ कारणातून खुनाची गंभीर घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रामगढताल पोलीस ठाण्यांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती गोरखपूर पोलिसांनी आपल्या टिवटर अकाऊंटमधून दिली आहे. तसेच, या धक्कादायक घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करू असं आश्वासन पोलिसांकडून दिलं आहे.