येवला, निफाड तालुक्यांतील विकासकामांना महावितरणने गती द्यावी : पालकमंत्री छगन भुजबळ

येवला

 येवला व निफाड तालुक्यांतील नव्या विद्युत उपकेद्रांची स्थापना, तसेच विद्युत उपकेद्रांची क्षमता वाढविण्याबरोबरच पाटोदा येथे अतिउच्चदाब उपकेंद्र स्थापन करावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

आज महावितरणकडील प्रलंबित विकास कामांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक व मालेगाव विभागाचे अधीक्षक अभियंता उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होण्यासाठी येवला तालुक्यातील चिचोंडी, अंगुलगांव, कुसुर, पिंपळगांव जलाल, जऊळके,  सोमठाणदेश, बल्हेगाव व निफाड तालुक्यातील दहेगांव या ठिकाणी नविन विद्युत केंद्राची स्थापना करण्यात यावी. तसेच निफाड तालुक्यातील खानगांव येथील उपकेंद्रांची क्षमता वाढवणे, नगरसूल येथे ५ एमव्हीए चे अतिरिक्त रोहित्र व येवला तालुक्यात ५ ऐवजी १० एमव्हीए चे रोहित्र बसविण्यात यावे, असेही  पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी संबंधितांना सांगितले आहे. तसेच येवला तालुक्यातील तालुक्यातील पाटोदा येथे १३२/३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम जलद गतीने पुर्ण करावे. अशा सुचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी विविध योजनांमधून महावितरण ही कामे प्रस्तावित असून लवकरच ही सर्व कामे मार्गी लावली जातील अशी माहिती नाशिक व मालेगाव महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!