हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात आईवडिलांसह एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या
पलवल
हरियाणाच्या पलवल येथून मोठी बातमी समोर येत आहे. सांगितले जात आहे, की पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद या गावातील एका कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच पोलिस घटनास्थळी पोहोचली. तीन मुलांसह पती-पत्नीच्या मृतदेहांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले होते. हे भांडण एवढे विकोपाला गेले की रात्री त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले. पतीचे नाव नरेश (33), पत्नी आरती (30), 7 वर्षीय संजय, 9 वर्षीय भावना आणि 11 वर्षीय रविता यांचा समावेश आहे. नरेश आणि त्यांच्या परिवार भावकीत राहत होता. त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख सकाळी उठले तेव्हा त्यांनी ही घटना दिसली. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच स्थानिक लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवले.