हैद्राबादमध्ये तंत्रज्ञान विशेषतज्ञ खोल खड्डयात पडला, अजून पर्यंत बेपत्ता

हैद्राबाद,

मानिकोंडा भागामध्ये शनिवारी रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्डयात एक तंत्रज्ञान विशेषतज्ञ पडला असून सोमवार पर्यंत त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही.

मानिकोंडामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खोल खड्डयत तंत्रज्ञान विशेषतज्ञ गोपीशेट्टी रजनीकांत (42) हे पडले व बुडाले. सोमवारी ही जवळपास 100 बचाव कर्मचार्‍यांनी त्यांना शोधण्याचे काम सुरु ठेवले आहे. शंका व्यक्त केली जात आहे की साठलेल्या पाण्याला काढण्यासाठी टाकण्यात येणार्‍या पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्डयात पाणी भरले होते त्यात गोपीशेट्टी पडले होते.

नेकनामपूर निवासी गोपीशेट्टी सिगारेट पिण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडले असता ते खड्डयात पडले आणि वाहून गेले. ते रस्त्यावर गुडघ्याभर भरलेल्या पाण्यातून चालत होते आणि चूकीने ते निर्माणाधीन खड्डयात पडले व वाहून गेले.

गोपीशेट्टी खड्डयात पडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत झाला. एक व्यक्ती येथील जलमग्न रस्त्याचा व्हिडीओ चित्रीत करत होता आणि त्याने या आश्चर्यचकित करणार्‍या दृश्याला आपल्या कॅमेर्‍यात टिपले.

घटनेच्या 48 तासानंतर ग-ेटर हैद्राबाद महानगर पालिका (जीएचएमसी) च्या आपती प्रतिक्रिया दल आणि साइबराबाद आयुक्तालयाचे विशेष पोलिस दल या व्यक्तीला शोधण्यात अयशस्वी राहिले. तर जवळच्या नेकनामपुर धरणातील शोध अभियानही निर्थक सिध्द झाले.

शोध अभियाना अंतर्गत अधिकारी ड्रोनचाही वापर करत आहेत. राष्ट्रीय आपती प्रतिक्रिया दल (एनडीआरएफ) च्या जवानानाही येथे तैनात करण्यात आले आहे. शोधामध्ये 100 पेक्षा अधिक बचावकर्मचारी तैनात आहेत. असा संशय व्यक्त केला जात आहे की गोपीशेट्टी हे इब-ाहिम चेरुवू किंंवा मुसी झीलमध्ये वाहून गेले आहेत. गोपीशेट्टी हे हैद्राबादच्या जवळील शादनगर गावातील एका कंपनीतील कर्मचारी होता.

महानगर पालिका अधिकार्‍यांनी दावा केला की गणेश चतुर्थीच्या कारण या भागात बॅरिकेटिंग करण्यात आली होती. मात्र व्हिडीओतून माहिती पडते की येथे कोणतेही बॅरिकेडस नव्हते आणि तो व्यक्ती सहजपणे या भागात पोहचला आणि यामुळे त्याचा मृत्यू झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!