उस्मानाबादमध्ये शेतात काम करत होता शेतकरी, आकाशातून पडला सोनेरी रंगाचा दगड

उस्मानाबाद,

जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात एका शेतामध्ये आकाशातून सोनेरी दगड पडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असतानाच अचानक आकाशातून एक दगड खाली पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आकाशातून उल्कापात पडल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. याबाबतचे संशोधन भूवैज्ञानिक विभाग करत आहेत.

वार्‍यासारखा आवाज आला आणि दगड पडला –

प्रभू निवृत्ती माळी नावाच्या शेतकर्‍याच्या शेतात हा दगड पडला आहे. माळी यांनी आपल्या शेतात भाजीपाल्याचं पीक घेतलं आहे. पण गुरुवारी रात्री उस्मानाबाद परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील वाफ्यात पाणी साचलं आहे का? हे पाहण्यासाठी माळी आपल्या शेतात गेले होते. दरम्यान, शुक्रवारी साडेसहाच्या सुमारास वाफ्याची पाहणी करताना अचानक वार्‍यासारखा आवाज झाला. काही कळायच्या आतच माळी उभे असलेल्या ठिकाणापासून सात-आठ फूट अंतरावर आकाशातून दोन किलो 38 ग-ॅम वजनाचा सोनेरी दगड पडला.

ः तपासणीसाठी दगड भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवला –

अचानक घडलेल्या या घटनेमुळे माळी भयभीत झाले होते. यानंतर त्यांनी त्वरित याची माहिती तहसीलदार नरसिंग जाधव यांना दिली. तहसील कार्यालयाकडून या दगडाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर हा दगड उस्मानाबाद येथील भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. हा दगड उल्कापात असल्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी वर्तवली आहे. हा दगड सध्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

उल्कापात पडल्याची जोरदार चर्चा –

हा दगड सोनेरी आणि गव्हाळ रंगाचा असून, त्यामध्ये विविध थर आहेत. 2 किलो 38 ग-ॅम वजन असणार्‍या या दगडाची लांबी 7 इंच इतकी आहे, तर रुंदी 6 इंच आहे. या दगडाची जाडी साडेतीन इंचापेक्षा अधिक असल्याची माहिती भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात आकाशातून उल्कापात पडल्याची जोरदार चर्चा आहे. तरी याबाबतचे संशोधन भूवैज्ञानिक विभाग करीत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!