धनबादच्या न्यायाधीशांना अॅटो रिक्शाने जाणूबूझून धडक मारली – सीबीआय
रांची,
केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने गुरुवारी झारखंड उच्च न्यायालयाला सूचित केले की जुलैमध्ये एका अॅटो रिक्शाने धनबादचे अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे) उत्तम आनंद यांना जाणूबूझून धडक मारली होती. ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
सीबीआयने म्हटले की सीबीआय प्रत्येक दृष्टिकोणातून न्यायाधीशांच्या म्ृत्यूचा तपास करत आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे आणि तपासामध्ये कोणताही दृष्टिकोन वाचणार नाही.
सीबीआयने म्हटले की आता पर्यंत अटक करण्यात आलेल्या दोन आरोंपीपैकी एका व्यवसायीक मोबाईल चोर आहे व तो नवीन काहिन बनवून सीबीआय तपासाला फसविण्याचा प्रयत्न करत राहिला आहे.सीबीआयने गुरुवारी झारखंड उच्च न्यायालयाच्या समोर म्हटले की 20 सीबीआय अधिकार्यांची एक टिम प्रकरणाचा तपास करत आहे. आता हे स्पष्ट आहे की जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाना जाणूबूझून अॅटो रिक्शाने धडक मारली होती त्यावेळी ते सकाळी फिरायला गेले होते. आम्ही प्रकरणातील षडयंत्रकार्यांचा शोध लावूत
झारखंड उच्च न्यायालयाने 16 सप्टेंबरला प्रकरणाची सुनवाई करत सीबीआय तपासावर नाराजी व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाने सीबीआयचे झोनल डायरेक्टरना गुरुवारी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते. सीबीआय प्रत्येक आठवडयाला आपल्या तपास प्रगतीचा अहवाल न्यायालयाला देत आहे.
अॅटो रिक्शाच्या धडकेने धनबादचे एडीजीचा मृत्यू झाला होता आणि 28 जुलैला घडलेली ही घटना सीसीटिव्ही कॅमेर्यात चित्रीत झाली होती. पोलिसांनी लखन वर्मा आणि राहुल वर्मा या दोघांना अटक केली होती.
झारखंड उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारद्वारा स्थापित एसआयटीवर विश्वास केला नाही आणि प्रकरणाला सीबीआयकडे सोपविले. सर्वोच्च न्यायालयानेही दिवसा झालेल्या घटनेत ज्यामध्ये एका न्यायाधीशाला निशाना बनविले गेले होते यावर आश्चर्य व्यक्त केले आणि तपासा बाबत आपली नाराजी व्यक्त केली होती.
सीबीआयच्या सूत्रानुसार या प्रकरणात आता पर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.