महिलेचा वेश परिधान करून घरफोड्या करणार्‍याला अटक

औरंगाबाद

महिलांचा गाऊन परिधान करून उच्चभ-ू वस्तीत घर फोड्या करणार्‍या अट्टल घरफोड्याला गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याविरुद्ध पाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा 37, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड असे या अट्टल घरफोड्याचे नाव आहे. नईमला दोन बायका असून, पहिल्या आणि दुसर्‍या पत्नीपासून त्याला सात अपत्ये आहेत. चुन्नू हा उच्चभ-ू वसाहतीमधील बंद घर फोडत असे. पूर्वी त्याच्याविरुद्ध खून, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याने घर फोडण्याला सुरुवात केली.

गेल्या काही दिवसांपासून एन-1. सिडको, मयूरपार्क, जटवाडा अशा वसाहतींमध्ये त्याने महिलांच्या वेशात घरफोड्या केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना चुन्नू हा घरफोड्या करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!