पीक पंचनामे करण्यात अडचणी, तरीही काम पूर्ण करणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद,

पिकांचे पंचनामे करण्यात काही मर्यादा येत आहेत. तसेच मनुष्यबळही कमी आहे. मात्र, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होतील आणि लवकरच शेतकर्‍यांना मदत मिळेल, असा विश्वास महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

फेब-ुवारीमध्ये निवडणूक होतील. आता हे अंतिम असून, कोरोना लाटेची तेवढीच भिती आहे. मात्र, शिवसेना तयार आहे. उद्धवजी म्हटले महाविकास आघाडीसोबत तर त्यांच्यासोबत लढू. नाहीतर एकट्याने लढायचं आदेश दिल्यास एकटे लढू. आणि ते नवीन सहकारी झाले तरीही त्यांच्यासोबत लढू. अंतिम आदेश उद्धजीचा असेल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

फुलंब-ी येथील एका शेतकर्‍याने पीककर्ज मिळावे या मागणीसाठी आंदोलन केले होते. इतकंच नाही तर त्याने डोकेही फोडून घेतले होते. त्यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देत शेतकर्‍यांना बँक कर्ज मिळायला अडचण येते. हे खरं आहे, त्यावर कारवाई करायलासुद्धा सांगितले आहे. मी स्वत: कलेक्टरला याबाबत सूचना देईन, असेही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!