पक्षाला राज्यातील विधानसभा निवडणुका केवळ मोदी लाटेमुळे जिंकता येणार नाही; येडियुरप्पा
बंगळुरु,
पक्षाला राज्यातील विधानसभा निवडणुका केवळ मोदी लाट जिंकण्यास मदत करू शकत नाही. लोकसभा निवडणुका जिंकण्यास मोदी लाट मदत करू शकते, पण राज्यातील निवडणूक जिंकायची असेल, तर पक्षाला विकास कामे करावीच लागतील, असे मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी रविवारी बंगळुरूमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. 2023 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका होणार असून त्याचसाठी आतापासूनच भाजपने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
केंद्रात पंतप्रधान मोदी खूप काम करत आहेत. ते पुढील निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधान होतील. पण राज्यातील काँग-ेसला जाग आली आहे. विरोधी पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखत असल्यामुळे आपण अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. पक्षबांधणी बूथ स्तरापासून करायला हवी, तरच आपण काँग-ेसला धडा शिकवू शकतो. हानेगल आणि सिंदगी मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकणे सोपे नाही. ही आपल्यासाठी अग्निपरीक्षा असल्याचेही येडियुरप्पा म्हणाले.
केवळ लोकसभा निवडणुका आपण मोदींच्या नावाने जिंकू शकतो, पण विधानसभा निवडणुका फक्त आपल्या कामांच्या आधारे जिंकल्या जाऊ शकतात, असेही ते म्हणाले. शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, डीव्ही सदानंद गौडा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार काटील यांच्या नेतृत्वाखाली चार संघ आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि निवडणुकीतील संभाव्यता जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा करतील, तसेच पक्षाच्या उणीवांवर या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. ऑॅक्टोबरपासून हा दौरा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.