ईडीने आझम खानची सीतापुर जेलमध्ये चौकशी केली
सीतापुर (उत्तर प्रदेश),
केंद्रिय प्रवर्तन निदेशालय (ईडी) च्या दोन सदस्यीय टिमने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समाजवादी पक्ष (सपा) चे खासदार मोहम्मद आझम खां यांची चौकशी करण्यासाठी सोमवारी सीतापुर जेलचा दौरा केला.
खासदार आझम खांना कोविड संक्रमणातून सावरल्यानंतर झालेल्या परेशानीला पाहता मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना 10 सप्टेंबरला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आणि परत जेलमध्ये पाठविले गेले.
बातम्यानुसार आझम खांची रामपुरमधील जौहर विद्यापीठाच्या फडिंगच्या बाबत चौकशी केली जात आहे. या विद्यापीठाला विदेशी फंडही मिळत होता.
रामपुर जिल्हा प्रशासनाने मागील आठवडयात मोहम्मद अली जौहर विद्यापीठाकडून 70.05 हेक्टरपेक्षा अधिक जमिनीला माघारी घेतले होते. या विद्यापीठाचे संचालन आझम खां यांच्या अध्यक्षतेखालील मौलाना मोहम्मद अली जौहर ट्रस्टद्वारे केले जाते आहे.
ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामध्ये बसपाचे आमदार मुख्तार अंसारीची चौकशी करण्याची तयारी करत आहे. माजी खासदार अतीक अहमदही ईडीच्या रडारवर आहेत.