पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

नवी दिल्लीमुंबई,

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती भारताने गेल्या 24 तासात 37,78,296 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 80 कोटीचा (80,85,68,144) महत्वाचा टप्पा पार केला आहे. एकूण 79,78,302 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 43,938 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,15,105 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.72म झाला आहे.

सलग 85 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 30,256 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,18,181आहे. उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.95म आहेत.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 11,77,607 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.36 कोटीहून अधिक (55,36,21,766) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.07म असून गेले 87 दिवस 3म पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.57म असून गेले 21 दिवस 3म पेक्षा कमी आणि 104 दिवस 5म पेक्षा कमी आहे.

इतर अपडेटस :

राज्येकेन्द्र शासित प्रदेशांना 15 लाखापेक्षा जास्त मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर, लसीच्या 5.43 कोटी पेक्षा जास्त शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!