मूसळधार पावसामुळे कोलकाताचा अधिकांश भाग पाण्याखाली
कोलकाता,
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरात रविवारी रात्रभर झालेल्या मुळधार पाऊस आणि भरतीच्या कारणामुळे शहरातील अधिकांश भाग हा पाण्याखाली बुडाला असून सोमवारी सकाळी शहराची स्थिती ठप्प झाली होती तर हवामान विभागाने स्थितीला अजून बिकट असल्याचे समजत पुढील 24 तासामध्ये दक्षिण बंगालमधील अधिकांश जिल्ह्यात अजून पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागानुसार रविवारी रात्रीला 12 वाजल्या पासून सोमवारी सकाळी 7 वाजे पर्यंत कोलकातामध्ये 132 मिमी पाऊस झाला. विभागाने म्हटले की बेहाला, मोमिनपूर, एकबलपूर, खिद्दरपूर, कालीघाटसह शहराच्या दक्षिण भागामध्ये शहराच्या उत्तर भागाच्या तुलनेते अधिक पाऊस झाला आहे. दक्षिण कोलकाताच्या अधिकांश स्थानांमध्ये 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे दक्षिण कोलकाताचा जवळपास पूर्ण भाग जलमय झाला आहे.
तर उल्टाडांगा (84मिमी), मानिकतला (77 मिमी), बेलगछिया (82मिमी) या भागामध्ये रविवारी रात्री अपेक्षाकृत कमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहराला अस्तव्यस्त केले आहे आणि शहरातील अनेक भाग विशेष करुन मध्य आणि दक्षिण कोलकाताच्या भागामध्ये पाणी भरले गेले. बेहाला, एमजी रोड, पार्क सर्कस, पार्क स्ट्रीट, स्थिएटर रोड, शेक्सपियर सरानी सारखे भाग गुडघ्या ऐवढया पाण्यात बुडाले होते. लोकांना आपल्या कार्यस्थळावर पोहचण्यासाठी पाण्यातून जावे लागले.
रविवारी रात्री 11 वाजल्या पासून सोमवारी दुपारी 3 वाजे पर्यंत ताला बंद करण्यात आल्यामुळे सर्व ठिकाणे जलमय झाले आहेत. आजही हुगली नदीमध्ये उच्च लाटांच्या कारणामुळे ताला द्वार रात्री 10 वाजल्या पासून दुपारी 3 वाजे पर्यंत बंद राहतील.
रविवारी लाटा 17 फुट उंची पर्यंत होत्या यामुळे स्वाभाविकपणे आम्हांला फाटकांना बंद करावे लागले. शहरातून पाणी बाहेर काढले जाऊ शकत नसल्याने शहरातील अनेक भाग हे जलमय झाले आहेत. आम्ही पाणी काढण्यासाठी कोलकातामधील 73 पंपिंग स्टेशनमध्ये पसरलेल्या सर्व 384 पंपाना सक्रिय केले आहे. कोलकाता महानगर पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की शहराच्या बाहेर परंतु पाणी स्वच्छ करण्यासाठी जवळपास सहा तास लागतील.
बंगालच्या खाडीत कमी दबावाचा पट्टा निर्माण झाल्याच्या कारणामुळे कोलकातासह दक्षिण बंगालमधील अधिकांश जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील 24 तासामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.