राजकारणाला गुडबाय करत असल्याचे म्हणत भाजप सोडणार्‍या बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश

कोलकाता,

भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शनिवारी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग-ेसमध्ये प्रवेश केला आहे. सुप्रियो यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर अलिकडेच भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. राजकारणातून निवृत्तीची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर आता तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे. यावेळी खासदार डेरेक ओब-ायन देखील उपस्थित होते.

फेसबुकवरुन राजकारण सोडण्याची घोषणा करून सुप्रियो यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी, बाबुल सुप्रियो यांनी आपण भाजपच्या बड्या नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी त्यांच्या पुढील निर्यणाबाबत अद्याप काहीही सांगितले नसल्याचे म्हटले होते. मी भविष्यात काय करणार, हे फक्त वेळच सांगेल असेही त्यावेळी सुप्रियो यांनी म्हटले होते.

तृणमूलच्या नेतृत्वाच्या संपर्कात भाजपचे अनेक नेते आहेत. भाजपमध्ये ते समाधानी नाहीत. एक (बाबुल सुप्रियो) आज सामील झाले आहेत, दुसरे उद्या सामील होऊ इच्छित आहे. ही प्रक्रिया सुरू राहील. थांबा आणि बघत रहा, अशी प्रतिक्रिया बाबुल कुणाल घोष यांनी यावेळी दिली.

मी जेव्हा राजकारण सोडणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्याचा अर्थ माझ्या मनाला पटला. मला वाटले की मला एक मोठी संधी सोपवण्यात आली आहे (तृणमूलमध्ये सामील झाल्यावर). माझे सर्व मित्र म्हणाले की राजकारण सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा आणि भावनिक होता, असे सुप्रियो यांनी म्हटले आहे.

माझा मला अभिमान आहे की मी माझा निर्णय बदलत आहे. बंगालची सेवा करण्याच्या उत्तम संधीसाठी माझ्यासाठी परत येत आहे. मी खूप उत्सुक आहे. सोमवारी दीदी (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) यांना मी भेटेन. या स्वागतामुळे भारावून गेलो आहे. दीदी आणि अभिषेकने मला एक उत्तम संधी दिली आहे. आसनसोलमुळे मी राजकारणात प्रवेश केला आहे. त्या मतदारसंघासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!