शास्त्रीनंतर गादी कोण चालवणार; ’या’ दोन खेळांडूंच्या नावांची चर्चा

दिल्ली,

चार वर्षापूर्वी कर्णधार विराट कोहलीशी मतभेद झाल्यामुळे अनिल कुंबळे कोच पदाचा राजीनामा दिला होता. तर आता अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण इंडियन क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत असू शकतात. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -20 वर्ल्डकपनंतर संपणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) कुंबळे आणि लक्ष्मण यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगण्याची शक्यता आहे.

अनिल कुंबळे 2016-17 मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची शास्त्रींच्या जागी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर कोहलीशी मतभेद समोर आले. यानंतर कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अनिल कुंबळे यांच्या व्यतिरिक्त बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ सनरायझर्स हैदराबादशी संबंधित लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधू शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘अनिल कुंबळे यांनी ज्या परिस्थितीत कोच पद सोडलं त्या परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज आहे. ज्याप्रकारे सीओए (प्रशासकांची समिती) कोहलीच्या दबावाखाली आली आणि कुंबळे यांना वगळण्यात आलं मात्र ते योग्य नव्हतं. दरम्यान कुंबळे किंवा लक्ष्मण या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत की नाही यावर देखील त्यांच्यावर अवलंबून असेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!