पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ
नवी दिल्ली,
आपल्यापैकी कोणी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे. सरकारकडून पुन्हा एकदा पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत आधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख देण्यात आली होती. ही मुदत आता सहा महिन्यांनी वाढवण्यात आली असून आधार आणि पॅन कार्ड ज्यांनी अद्यापपर्यंत लिंक नसेल केले, ते आता 31 मार्च 2022 पर्यंत करू शकतात. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील माहिती आयकर विभागाने टिवट करून दिली आहे. आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख, जी आधी 30 सप्टेंबर होती, ती आता कोरोना महामारीमुळे करदात्यांना भेडसावणार्या आव्हानांमुळे आणखी 6 महिने वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारने यावर्षी चौथ्यांदा आधार-पॅन लिंक करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. याआधी जुलै महिन्यात, कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे येणार्या अडचणींमुळे सरकारने शेवटची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.
आधार-पॅन कार्ड लिंक करण्याच्या काही टीप्स पॅन कार्ड-आधार कार्डला लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. आपला पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, नाव आणि मोबाईल नंबर त्या वेबसाईटवर टाका.