पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेला रेल्वे पोस्टचा कर्मचारी निलंबित

जयपूर,

पोलीस गुप्तचर विभागाने हेरगिरीच्या आरोपाखाली रेल्वे टपाल सेवा जयपूरच्या एका कर्मचार्‍याला सुमारे 8 दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर टपाल खात्याने त्या कर्मचार्‍याला निलंबित केले आहे. जयपूरस्थित रेल्वे टपाल सेवेतील एमटीएस कर्मचारी भरत बावरी याला 10 सप्टेंबर रोजी गुप्तचर विभागाने अटक केली होती. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या भरत बावरीने भारतीय लष्कराची महत्त्वाची गुप्त कागदपत्रे पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीच्या महिला एजंटला व्हॉटसअ‍ॅपद्वारे पाठवली होती. अटकेनंतर सुमारे 8 दिवसांनी भरत बावरीला टपाल विभागातील विभागातून निलंबित करण्यात आले आहे.

राजस्थान गुप्तचर विभागाचे महानिदेशक उमेश मिश्रा यांच्या मते जयपूरस्थित रेल्वे पोस्टल सर्व्हिसचे एमटीएस कर्मचारी भरत बावरी हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या महिला एजंटच्या हनीट्रॅपमध्ये अडकले होते. त्या महिलेने बावरी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून व्हॉटसअ‍ॅपद्वारे भारतीय लष्कराच्या सामरिक महत्त्वाचे गोपनीय कागदपत्रांचे फोटो व्हॉटसअ‍ॅपद्वारे मिळवले. हे फोटो पाठवल्या प्रकरणी बावरी यांना अटक करण्यात आली आहे. लष्कार आणि राजस्थानच्या गुप्तचर संघटनेने संयुक्तरित्याही कारवाई केली. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

फेसबूक आणि व्हाटस्अ‍ॅपवरून संभाषण-

चौकशीमध्ये भरत बावरी हा मुळचा जोधपूर जिल्ह्यातील खेडापा गावचा रहिवासी आहे. तीन वर्षापूर्वीच तो एमटीएस परीक्षेच्या माध्यमातून रेल्वेच्या पोस्टल विभागात जयपूरच्या कार्यालयात सेवेत रुजू झाला होता. इथे तो आवक जावक विभागात पत्रांच्या छाननीचे काम करत होता. मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी त्याच्या फेसबूकच्या मॅसेंजरवर महिलेचा संदेश आला होता. त्यानंतर काही दिवसांनतर ते दोघे व्हाटसएप पर व्हिडिओ कॉलवरून संभाषण करू लागले. त्या महिलेने तिचे नाव छदम असे सांगत ती पोर्ट ब्लेयरमध्ये नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून एमबीबीएसची तयारी करत असल्याचे तिने सांगितले होते.

महिलेने स्वत:चे फोटो पाठवून केला हनीट्रॅप-

हनीट्रॅप करणार्‍या महिलेने जयपूरमधील एका नातेवाईकाचे लष्कारातील दुसर्‍या विभागात बदली करयाचे असल्याचे सांगत बावरीकडून लष्करासंबंधात येणार्‍या कागदपत्रांची माहिती मागवण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने आरोपी बावरीला जयपूरला येऊन भेटण्याचे आणि फिरायला जायचे, त्याच्या सोबत राहायचे आश्वासन देऊन त्याला स्वत:चे काही फोटो पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी चांगलाच तिच्या जाळ्यात फसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने महत्वाची माहिती मागवायला सुरुवात केली आणि बावरीने देखील तिला लष्कराच्या गोपनिय दस्तावेजांचे, पत्रांचे फोटो व्हाटसअ‍ॅप करायला सुरुवात केली.

आरोपीच्या फोनची तपासणी करून तथ्य तपासल्यानंतर आरोपी विरोधात शासकीय गोपनिय माहिती अधिनियम 1923 च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने चौकशीमध्ये हे देखील स्पष्ट झाले आहे, की तो त्या महिलेच्या मागणीवरून स्वत:च्या नावे एक सिम आणि मोबाईलाचा ओटीपी देखील शेअर केला होता. ज्याचा वापर लष्कारातील अन्य जवानांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी करता येईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!