एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग
सातारा,
एखादे वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये असा ींऊध्चा नियम आहे. मात्र, अनेक वेळा याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात पुढे आला आहे. वाई डेपोची एसटी मुंबईला जात असताना चालक चक्क वाहन चालवताना एका हातात मोबाईल घेत बोलत आहे आणि दुसर्या हाताने स्टेअरिंग, असे चित्र दिसून आले. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.
सातार्यात एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, सुरु होता. सातार्यातील एका एसटी वाहकाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात हा वाहक मोबाईलवर बोलत एका हाताने बस चालवत आहे. अशा प्रकारे वाहन चालवताना गाडीवरील नियंत्रण सूट शकते किंवा अपघात होऊ शकतो. असे असताना चालक मोबाईलवर बोलाताना दिसून येत आहे. त्यामुळे मोबाईलवर बोलणे हे बसमधील प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया गाडीतील प्रवाशांनी दिली. जर अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सातार्यातून मुंबईकडे येणारी ही एसटी वाई डेपोची असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईला जात असताना एका जागरुक प्रवाशाने हा सर्व प्रकार कॅमेर्यात चित्रत केला आणि आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.