साप्ताहिक राशिभविष्य

दि. 19 सप्टेंबर 2021 ते 25 सप्टेंबर 2021

मेष : मुलामुलींच्या दृष्टीने काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना काही समस्या जाणवतील. कटाक्षाने कोणतीही शुभ कामे नकोत. महत्त्वाचे निर्णय नकोत. शासकीय कामे नकोत. प्रवास टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील. आपल्या हातून शासकीय नियमांचे उल्लंघन होत नाही ना, याची दक्षता घ्यावी.

वृषभ : आपल्या आर्थिक लाभामध्ये काहीही कमी पडणार नाही. शुभ कामे नकोत. शासकीय कामांत यश मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारात व नोकरीत स्वास्थ्य राहील. आरोग्य चांगले राहील. सढळ हस्ते खर्च कराल. प्रियजनांसाठी खर्च कराल. सार्वजनिक कार्यात आपले श्रेष्ठत्व सिद्ध कराल.

मिथुन : आपल्या बुद्धीकौशल्याचा उपयोग करून घ्याल. आपल्या बुद्धीला, अनुभवांना योग्य ती संधी मिळणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. काहींना मनाविरुद्ध प्रवास करावा लागणार आहे. अनेकांना मार्गदर्शन कराल. भावी आयुष्याच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी समजेल. तडजोडीचे धोरण ठेवावे.

कर्क : प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांकडे काही कामे असली तर वरिष्ठांची भीती न बाळगता आपली कामे नि:संकोचपणे सांगा, ती पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. प्रवासाचे योग येतील. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहणार आहे.

सिंह : कोणतेही शुभ कार्य नको. प्रवास कटाक्षाने टाळावेत. शासकीय कामे नकोत. वरिष्ठांकडे कोणतेही प्रस्ताव घेऊन जाऊ नका. तडजोडीचे व सबुरीचे धोरण ठेवावयास हवे. व्यवसायात धाडस नको. नवीन जबाबदारी घेण्याचे शक्यतो टाळावे. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. वरिष्ठ व वडिलधारी व्यक्तींकडून अपेक्षा नको.

कन्या : महत्त्वाचे निर्णय आज नकोत. कोणतेही महत्त्वाचे शुभकाम नको. प्रवास टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष हवे. घरात जर वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या आजाराकडे विशेष लक्ष द्यावे. प्रवास टाळावेत. खर्च वाढणार आहे.

तूळ : मित्र, सहकारी, वरिष्ठ ऐनवेळी तोंडघशी पाडतील. हितशत्रूंचा त्रास जाणवेल. मात्र, विरोधक आपले नुकसान करू शकणार नाहीत. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. सहकार्‍यांची वागणूक पाहून आपण वैतागून जाल. काहीजणांच्या मनात निराशाजनक विचार येतील. वैवाहिक जीवनात मतभेद गंभीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

वृश्चिक : स्वभावात चिडचिडेपणा वाढणार आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवनात व सहकार्‍यांमध्ये वैचारिक दरी निर्माण होईल. महत्त्वाचे निर्णय कटाक्षाने टाळावेत. नवीन प्रकल्प तूर्त हातात घेऊ नका. स्वभावामध्ये कडकपणा व ताठरपणा निर्माण होईल.

धनु : वास्तू, फ्लॅट, वाहनखरेदी इ. गोष्टी पुढे ढकलाव्यात. मानसिक अस्वास्थ्य वाटेल. व्यवसायात अडचणी आल्या तरीही आपल्या प्रामाणिकपणे वागण्याच्या स्वभावामुळे प्रगती होत राहील. आरोग्य चांगले राहील. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. मुला-मुलींसंदर्भात एखादी समस्या निर्माण होईल.

मकर : एखादे साहस करण्याची उर्मी निर्माण होईल. साहस कटाक्षाने टाळावे. प्रवासही टाळावेत. वास्तू, फ्लॅट, बंगला या कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक प्रगतीमध्ये मात्र खंड पडणार नाही. शासकीय कामे नकोत. खर्च वाढतील. कौटुंबिक जीवनात मात्र चांगले वातावरण राहील.

कुंभ : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. उधारी वसूल होईल. आरोग्याकडे लक्ष हवे. संततीसौख्य लाभेल. काहींची अध्याात्मिंक प्रगती होईल. मित्रांच्या आश्वासनांवर अवलंबून राहू नये. घरातील वृद्ध व्यक्तींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

मीन : कोणत्याही नवीन कामाचा विचार नको. कोणताही धोका पत्करू नये. धाडस शक्यतो टाळावे. वैवाहिक जीवनात मतभेद राहतील. संततीसुखही सामान्यच आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!