जे.ई.एस. महाविद्यालयामध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न

जालना,

येथील जे.ई.एस. महाविद्यालयामध्ये आज रोजी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ’शिवस्वराज्य दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने या निमित्ताने विविध स्पधार्ंचे आयोजन करण्यात आले होते. या स्पधार्ंमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सुरुवातीला मराठवाडा मुक्ति दिनाच्या निमित्ताने मा. प्राचायार्ंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. घुसिंगे वर्षा देवीसिंग, चुंगडे सोनाली शामसिंग, लोखंडे राहुल भाऊसाहेब, वैष्णवी वाघमारे, आदित्य सुनील कुलकर्णी, जयंत कल्याणकर, पूनम वैजनाथ शिंदे, वरद भांगत्रिडया, साचल महेश बिहानी, आदित्य एस. चांडलिया यांनी विविध स्पधार्ंमध्ये पारितोषिक पटकावले. यावेळी वांग्मय मंडळाचे प्रमुख डॉ. नानासाहेब गोरे, एन.सी.सी. चे कॅप्टन डॉ. फुलचंद मोहिते उपस्थित होते. विविध स्पधार्ंचे संयोजक व परीक्षक म्हणून प्रा. शिवाजी वानरे, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. हेमंत वर्मा, डॉ. मनीषा सुतार, प्रा. कविता बागडी, प्रा. भाग्यश्री बियाणी यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!