नेहरु युवा केंद्रातर्फे फिट इंडिया फ्रिडम रनचे दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी आयोजन
जालना,
आझादीका अमृत महोत्सव मोहिमे अंतर्गत देशभरात फिट इंडिया रन 2.0 चे आयोजन करण्यात आले असुन नेहरु युवा केंद्र, जालना तर्फे फ्रिडम रन 2.0 चे आयोजन दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता गांधी चमन पासुन मोतीबागपयर्ंत आयोजित केले आहे.
नेहरु युवा केंद्र कार्यालयाशी संलग्नीत असणार्या युवा व युवती मंडळांनी तसेच जिल्ह्यातील क्रिडा प्रेमींनी या दौडमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.