20 सप्टेंबर 2021 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जालना,

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने. समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने दि. 4 मार्च 2013 अन्वये जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याचे तिसर्‍या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपयर्ंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करू इच्छिणार्‍या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करण्यात यावे असे आवाहन करण्यात येते.

अर्ज स्विकृतीचे निकष

तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे आसावेत.तक्रार, निवेदन दोन प्रतित सादर करावेत.सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे.अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांचेकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करू शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. तरी महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!