अपर जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश जारी
जालना,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर -ऑक्टोबर 2021 मध्ये होणार्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा 12 वी दि.16 सप्टेंबर 2021 ते दि. 11 ऑक्_ोबर 2021 तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा 10 वी दि. 20 सप्टेंबर ते 8ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
या परिक्षेच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये याकरीता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभाग औरंगाबाद यांनी जालना जिल्ह्यातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्र परिसरात परिक्षा चालु असतांना काही पालक, परिक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करीत असतात. परिक्षार्थ्यांना नकला पुरविणे व परिक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत राहणे त्यांच्या या कृतीमुळे परिक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परिक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही परिक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संजिहता 1973 चे कलम 144 अंतर्गत वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागु राहील.
अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके जालना यांनी फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना प्राप्त अधिकारान्वये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी जालना जिल्ह्यातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस, देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परिक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. हा आदेश परिक्षा कालावधीत सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 पयर्ंत अंमलात राहील. असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आदेशीत केले आहे.