वर्धा नदी बोट दुर्घटनेतील 10 जणांचे मृतदेह हाती

अमरावती,

जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जणांची बोट वर्धा नदीत उलटून मोठी दुर्घटना घडली. बोटीमधील सगळे नदीत बुडाले. ही मन हेलावून टाकणारी घटना राज्यात चर्चेत होती. दुर्घटनेच्या दिवशी तीन जणांचे मृतदेह हाती लागले होते. यामध्ये मंगळवारी तीन मृतदेहांचा शोध लागला. आता आणखी बेपत्ता झालेल्यांचा शोध लागला असून आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

वर्धा दुर्घटनेतील बोट बुडण्याआधीचा व्हिडिओ आला समोर

अद्याप एकाचा मृतदेह शोधन्याचे काम बचाव पथकाकडून सुरु असून आहे. काल कोणाचाही मृतदेह हाती लागला नव्हता. आज पुन्हा पहाटे पासून बचाव कार्य सुरु झाले. तबल 45 तासानंतर पाच घटनास्थळापासून पाच किलोमीटरवर मृतदेह हाती लागले आहे. ज्यामध्ये पियुष तुळशीदास मटरे या दहा वर्ष मुलाचा आणि अन्य चार मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित तीन मृतदेह शोधण्याचे काम र्‍ींइ, एींइ आणि ींइ च्या पथकांचे सुरु होता.

या अपघातातून बचावले दोघे

– श्याम मनोहर मटरे, वय 25 वर्ष

– राजकुमार रामदास उईके, वय 45 वर्ष

हे दोघे नाव नदीत उलटल्यानंतर त्यांना नदीत पोहणे असल्याने पोहोत सुखरूप बाहेर आले.

बुडालेल्या सदस्यांची नावे

– नारायण मटरे, वय 45 वर्ष रा.गाडेगाव

– किरण विजय खंडाळे, वय 28 वर्ष रा. लोणी

– वंशिका प्रदीप शिवनकर, वय 2 वर्ष रा. तिवसाघाट

– अश्विनी अमर खंडाळे, वय 21 वर्ष

– निशा नारायण मटरे, वय 22 वर्ष

– पियुष तुळशीदास मटरे, वय 8 वर्ष

– अतुल गणेश वाघमारे, वय 25 वर्ष

– वृषाली अतुल वाघमारे, वय 20 वर्ष

– आदिती सुखदेव खंडाळे, वय 10 वर्ष

– मोना सुखदेव खंडाळे, वय 12 वर्ष

– पूनम प्रदीप शिवनकर, वय 26 वर्ष दरम्यान, यातील एक जण बेपत्ता आहे. बोट बुडाल्यानंतर तब्बल 50 तासानंतर मिळाले सात जणांचे मृतदेह हाती लागले. एकूण 10 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आणखी एकाच शोध सुरु आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!