तामिळनाडूमध्ये नीट परिक्षार्थीनीची आत्महत्या

चेन्नई,

तामिळनाडू राज्यातील वेल्लोर जिल्ह्यामधील काटपाडीमध्ये वैद्यकिय प्रवेशासाठी असलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परिक्षा (नीट) साठी बसलेली विद्यार्थीनी सौंदर्या टी बुधवारी आपल्याच घरात मृत आढळून आली. तिने रविवारी नीटची परिक्षा दिली होती आणि तिने आपल्या मैत्रींणीना सांगितले होते केी तिची परिक्षा चांगली गेली नाही. पोलिसांना संशय आहे की नीट परिक्षेत चांगले प्रदर्शन न करण्याच्या कारणामुळे तिने आत्महत्या केली असावी. मात्र आत्महत्येची कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही.

नीट परिक्षेच्या दबावाच्या कारणामुळे राज्यात सौंदर्याच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. कारण नीट परिक्षेच्या काही तास आधी रविवारी सकाळी एक 19 वर्षीय विद्यार्थी धनुष त्याच्या घरीच मृत अवस्थे सापडला होता.

तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातील एका वकिल दाम्पत्यांची मुलगी कनिमोझीने सोमवारी संध्याकाळी नीटची परिक्षा चांगली न गेल्याने आत्महत्या केली होती.

शिक्षक आणि मैत्रीणीनुसार सौंदर्या जिने आपल्या स्थानिय सरकारी शाळांमध्ये वर्ग दहावी आणि 12वीमध्ये टॉप केले होते. ती एक उशार विद्यार्थीनी होती. मात्र तिने आपल्या सहकार्‍यांना सांगितले की तिने रविवारी जी नीट परिक्षा दिली होती ती मुश्किल होती आणि तिला दिसून आले की ती परिक्षेत पास होणार नाही.

पोलिसांनी सांगितले की तिचे आई-वडिल एस.तिरुनावक्कारासू आणि टि-रुक्मणी हे मजूर आहेत आणि ते बुधवारी पहाटे वेल्लोरच्या कटपडीच्या जवळील कथालपट्टी गावाला जाण्यासाठी घरातून निघाले होते. आई-वडिल घरातून गेल्यानंतर सौंदर्या घरात एकटीच होती आणि ज्यावेळी शेजार्‍यांनी तिला सकाळी 10.30 वाजता फोन केला तर तिने कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर शेजारच्यांनी पोलिसाना आणि तिच्या आई-वडिलांना फोन केला. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तर आतमध्ये तिचे शव मिळाले. पोलिसांनी कलम 174 अंतर्गत अप्राकृतिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे.

द्रमुक सरकार राज्यातील नीट परिक्षांना समाप्त करण्याचा आग-ह करत आहे आणि म्हटले की गरीब पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना परिक्षा अवघड जात आहे.

मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी तामिळनाडू विधानसभेत नीट परिक्षाच्या विरोधात एक प्रस्ताव सादर करत म्हटले होते की गावांमध्ये राहणारे विद्यार्थी परिक्षा पास करु शकत नसल्याचे दिसत आहेत. कारण त्यांना चांगले कोचिंग मिळत नाही आणि राज्याला असे व्हायला नको आहे.

नीट विरोधी विधेयकाला तामिळनाडू विधानसभेत सर्वसहमतीने मंजूर करण्यात आले तर भाजपच्या आमदारांनी याला विरोध केला व सभागृहातून बहिष्कार केला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!