मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसला विजयाची आशा; विधानसभा निवडणुकीआधी चांगल्या नेतृत्त्वाच्या शोधात

अहमदाबाद,

गुजरातमध्ये 2022मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, भाजपनं विजय रूपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती केल्यानं काँग-ेससमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. निवडणुकींना 15 महिने बाकी असताना भाजपनं, शक्तीशाली पटेल समुदायाच्या मतपेटीवर नजर ठेवून भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात विजय रूपाणी यांना आलेलं अपयश आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर होणारी टीका यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा आहे.

आता काँग-ेस पटेल समाजाला आकर्षित करण्यासाठी आणि अहमद पटेल यांची उणीव भरून काढण्यासाठी कोणाकडे नेतृत्व सोपवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहमद पटेल हे गुजरातमधील काँग-ेसचे बडे नेते होते. अनेक वर्षं त्यांनी काँग-ेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निधनानंतर काँग-ेसला गुजरातमध्ये चांगलं नेतृत्व मिळणं गरजेचं आहे.

2017च्या निवडणुकीत काँग-ेसनं आश्चर्यकारकरित्या चांगली कामगिरी करत मतांच्या टक्केवारीत 40 टक्क्यांहून अधिक झेप घेत, भाजपच्या विजयी मताधिक्याच्या आसपास मतं मिळवली होती. या पार्श्वभूमीवर भाजपनं पुढील वर्षीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच हा एक भाग आहे. 2017च्या निवडणुकीतील काँग-ेसच्या यशात जिग्नेश मेवाणी, पाटीदार आरक्षणाची मागणी करत भाजपवर दबाव आणणारे हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या त्रिकुटाचा मोठा वाटा होता. त्याचवेळी राहुल गांधींनी  2017 मध्ये सगळं राज्य पालथं घातलं होतं. गुजरातमधील आदिवासी, शेतकरी, पटेल यांच्यासह सर्व महत्त्वाच्या घटकांपर्यंत ते पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इथलं प्राबल्य लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी विवादास्पद आणि वैयक्तिक मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला होता.

‘विकास गांडो थायो छे’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे’ अशी घोषणा देत भाजपनं दिलेली विकासाची आश्वासनं पोकळ असल्याचं दर्शवत त्याविरुद्ध आवाज उठवण्याची भूमिका काँग-ेसनं घेतली होती. यावरच प्रचाराचा सगळा भर होता. पण याचा विपरित परिणाम झाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग-ेसला मोठ्ठं अपयश पाहावं लागलं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अमित चावडा आणि विरोधी पक्षनेते परेश धनानी यांना राजीनामा द्यावा लागला. तर 2019 मध्ये काँग-ेसमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेल यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. मात्र सध्या काँग-ेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. काँग-ेसचे गुजरातमधील बिनीचे शिलेदार राहिलेले अहमद पटेल यांच्या अनुपस्थितीमुळे तर पक्षाला मोठा तोटा होणारच आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतील काँग-ेसच्या विजयामुळे भाजपचं वर्चस्व असलेल्या राज्यात काँग-ेसची सत्ता येऊ शकते, अशी आशा निर्माण झाली आहे, पण सध्या तरी पक्षात निराशेचं वातावरण आहे. त्यामुळेच राहुल गांधी गुजरातवर विशेष लक्ष देत आहेत, असं पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी म्हटलं आहे.

2024 लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधानांच्या गृह राज्यात भाजपचा पराभव हा सर्वात मोठा धक्का ठरेल, असं त्यांना वाटतं. दरम्यान, गुजरातमधील काँग-ेसचे प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पदासाठी योग्य नेत्याचा शोध सुरू आहे. या पदावर राहुल गांधी यांना कोणीतरी तडफदार नेत्याची निवड करायची आहे. याकरता भूपेश बघेल यांचं नाव पुढं आलं होतं. बघेल हे उत्तम प्रशासक, कुशल संघटक असून, त्यांचं राहणीमान अत्यंत साधं आहे. त्यामुळं त्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये पक्षाचे यशस्वी नेतृत्व करणारे सचिन पायलट यांचंही नाव अग-क्रमानं पुढं येत आहे. त्यांच्यासारखा तरुण, कार्यक्षम नेता गुजरातमध्ये उत्तम काम करू शकतो. राजस्थानच्या शेजारीच गुजरात असल्यानं राजस्थानमधील जबाबदारीही ते सांभाळू शकतात असं बोललं जातंय.

गुजरातमधील भाजपच्या मुख्यमंत्री बदलाच्या खेळीनंतर काँग-ेस आपली रणनीती कशी आखते याकडं सर्वांचं लक्ष लागलं असून, राज्यातील काँग-ेसची धुरा भूपेश बघेल आणि सचिन पायलट यांच्यापैकी कोणाच्या खांद्यावर दिली जाणार हा सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!